आरोग्यताज्या बातम्या

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lifestyle After 40 | चाळीशी आली असेल तर आरोग्याकडे एक नजर टाकण्याची वेळ आली आहे. आपल्या राहणीमानात बदल करण्याची वेळ आली आहे (Lifestyle After 40). आहारात योग्य फायबर, फळे, भाज्या आणि इतर पोषक तत्वांचा समावेश करा (Include Fiber, Fruits, Vegetables And Other Nutrients In Diet).

वयाच्या ४० व्या वर्षी अनेक जण आर्थिकदृष्ट्या स्थिर होतात. पण कामवाढीमुळे दररोजचे ताणतणावही वाढतात. ऑफिस आणि कौटुंबिक आयुष्य यांचा समतोल साधताना कसरत करावी लागते. वाढलेल्या तणावामुळे रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, संधिवात ते नैराश्यापर्यंत (Blood Pressure, Diabetes, Obesity, Rheumatism, Depression) समस्या वाढत जातात. वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात, त्यामुळे नंतर पश्चाताप होऊ नये म्हणून वेळीच राहणीमानात बदल करणे चांगले (Lifestyle After 40). चला जाणून घेऊया वयाच्या ४० व्या वर्षानंतर कोणत्या प्रकारचे राहणीमान आपलेसे करणे आवश्यक आहे?

 

१. संतुलित आहार घ्या (Eat Balanced Diet) –
प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटकांचे संतुलित सेवन करा. तसेच लठ्ठपणा, मधुमेह आणि बद्धकोष्ठता (Constipation) टाळण्यासाठी हिरव्या भाज्या (Green Vegetables) खा.

 

२. दररोज व्यायाम करा (Do Exercise Daily) –
तुम्ही वॉक, जॉगिंग, सायकलिंग किंवा झुंबा आणि पायलेट्स (Walking, Jogging, Cycling Or Zumba And Pilates) करू शकतात. एरोबिक्स आणि योगा या दोन्हींचा लाभ घेणे चांगले. अगदी हायकिंग, ट्रेक, पोहणं किंवा उद्यानात फिरणंही फायद्याचं ठरतं.

 

3. पुस्तकं वाचा आणि मनन करा (Read Books And Meditate) –
एखादे पुस्तक वाचणे, ध्यान करणे आणि संगीत ऐकणे आपल्या मनःस्थितीसाठी सर्वोत्तम असल्याचे सिद्ध होते. मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद वाटतो. निवृत्तीची वाट पाहू नका आणि आवडीच्या गोष्टी करा. दररोज ६ ते ७ तास झोप घ्या. झोपण्यापूर्वी सर्व गॅजेट्स बंद करून झोपण्याचा प्रयत्न करा.

४. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या (Get Regular Health Checkup) –
आपले वजन, बीपी, साखर, लिपिड्स (Weight, BP, Sugar, Lipids) यासारख्या गोष्टींची माहिती असायला हवी. दरवर्षी आरोग्य तपासणी करायला विसरू नका.

 

5. धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहा (Stay Away From Smoking And Alcohol) –
धूम्रपान किंवा मद्यपान केल्याने, आपल्याला काही काळ हलके वाटू शकते, परंतु दीर्घकाळापर्यंत, त्यांचे परिणाम हानिकारक आहेत.

 

6. महत्वाच्या बाबींना प्राधान्य द्या (Prioritize The Important Things) –
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांना महत्त्व देणं, त्यात आनंदी राहणं आणि समाजाप्रति आणि कुटुंबातील व्यक्तींबाबत कृतज्ञता बाळगण्याचा प्रयत्न करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lifestyle After 40 | make these 5 changes in lifestyle after 40

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, औरंगाबादच्या सभेत ‘राज’गर्जना (व्हिडिओ)

 

Devendra Fadnavis | ‘तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही’; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

 

Buttermilk | उन्हाळ्यात ताकाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं, पण ‘या’ लोकांसाठी अडचणी वाढू शकतात; जाणून घ्या

Back to top button