पुण्यातील वाहतूक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी कटिबद्ध : पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

वाहन चालविण्याच्या बाबतीत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं, मात्र आता पुणे शहराच्या ट्रॅफिकचे सारथ्य करण्याची जिम्मेदारी एका महिला अधिकाऱ्यावर असणार आहे. तेजस्वी सातपुते यांना शहराच्या दुसऱ्या महिला वाहतूक पोलीस उपायुक्त होण्याचा मान मिळाला आहे.  ट्रॅफिक समस्या असलेल्या आशिया खंडातील  प्रमुख  शहरांच्या यादित पुणे शहराचा क्रामंक लागतो. त्यामुळे त्यांच्यापुढे वाहतूकीच्या बाबतीत अनेक प्रकारची आव्हाने असणार आहेत.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5264fc55-9c95-11e8-b9c2-03006756dc29′]

पुणे शहराच्या नवनियुक्त वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून तेजस्वी सातपुते यांनी आज (शुक्रवार) आपल्या पदाचा कार्यभार मावळते वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांच्याकडून स्वीकारला. पुणे ग्रामिण वरुन पुणे शहर पोलीस उपायुक्त पदी त्यांची  नियुक्ती झाली आहे.

वाहतूक विभाग हा शहरातील अंत्यत महत्वाचा विभाग असून, या विभागात काम करत असताना वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत पुण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ट्विट च्या माध्यामातून म्हटलं आहे.

वाहतुकीच्या बाबतीत कोणत्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्यायचे असे विचारले असता त्या म्हणाल्या “सध्या असलेल्या  ट्राफिक यंत्रणेत मोठे इन्फ्रास्ट्क्चरल बदल न करता छोटे-छोटे  बदल करून ट्रॅफिक सुरळीत कसे करता येऊ शकते याला प्राधान्य दिले जाणार आहे. ज्याला काही वेळ लागू शकतो, इन्फ्रास्ट्क्चरल डेव्हलोपमेंट करावी लागू शकते. किंवा इतर  प्रशासकीय विभागांची मदत घ्यावी लागणार आहे.  अशा गोष्टींना  त्यानंतर प्राधान्य दिले जाईल. लोकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊन जितक्या कमीत-कमी वेळेत समस्या सोडवण्यात येतील याला महत्व दिले जाणार आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f265fc10-9c95-11e8-9cc8-930e574af3b3′]

ऍडपटिव्ह  ट्राफिक मॅनेजमेंटला प्राधान्यः
स्मार्ट सिटी बाबत मी ऐकले आहे. ऍडपटिव्ह  ट्रॅफिक मॅनेजमेंट  नियोजन आता सुरु आहे. त्यासाठी लवकरात -लवकर काम  सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले जेणेकरून शहरातले सेन्सर असलेले ट्रॅफिक सिग्नल अधिक चांगल्या प्रकारे काम करतील. त्यामुळे ट्रॅफिक समस्या सोडवण्यास मदत होईल.

ट्रॅफिक ही अशी शाखा आहे ज्यात वारंवार बदल होतच राहतात. त्यामुळे ट्रॅफिक सोडविण्याकरिता प्रयत्न केले जातील. तसेच या अगोदर जे अधिकारी होते त्यांनी ज्या काही चांगल्या योजना राबविल्या आहेत त्या जशाच्या तशा पुढे चालू  ठेवल्या जातील. तसेच आताच्या स्थितीत लोकांकडून  ज्या काही समस्या पुढे येत आहेत त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

पहा नेमक्या कोण आहेत आयपीएस तेजस्वी सातपुतेः
तेजस्वी सातपुते या मूळच्या शेवगाव येथे राहणाऱ्या असून, शिक्षणाच्या बाबतीत त्या नेहमीच अव्वल असायच्या. त्यांनी बारामती येथून बीएस्सी बायोटेक्नोलाॅजी शिक्षण घेतेले. त्यानंतर त्यांनी एल.एल.बी चे शिक्षण घेतेले. पुण्यात  शिक्षण घेत असताना त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत कुतूहल निर्माण झाले त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सुरुवात केली आणि २०१२ रोजी त्या आयपीएस  परिक्षा उत्तीर्ण झाल्या. या गुणवत्ता यादितमध्ये त्या देशात १९८ व्या क्रमांकावर होत्या