Driving License | दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी जर केल्या ‘या’ 5 चूका तर रद्द होईल तुमचे ‘DL’, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : Driving License | यावर्षी सणासुदीच्या काळात धोकादायक (Dangerous) ड्रायव्हिंग करणे (Driving License) किंवा ट्रॅफिक नियम तोडणे (Traffic Violation) तुम्हाला आणखी महागात पडणार आहे. विशेषता 2 नोव्हेंबर धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी आणि 4 नोव्हेंबर दिवाळी (Diwali) च्या दिवशी रस्त्यावर गाडी सावधगिरीने चालवा.

कारण, मोदी सरकारने देशात नवीन मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट (Motor Vehicles Amendment Act 2019) लागू केल्यानंतर दंडाची रक्कम पहिल्याच्या तुलनेत अनेक पटीने वाढवली आहे.

नवीन मोटर वाहन कायदा 2019 चा नियम, दंड रक्कम (Penalty), चलानबाबत अनेक बदल केले आहेत.
नवीन वाहन कायद्यात रस्ते दुर्घटना रोखण्यासाठी ठोस तरतुद करण्यात आल्या आहेत.

ट्रॅफिक नियम तोडल्यास दंड आणखी वाढवण्यात आला आहे. सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सह आरसी (RC) आणि गाडी इन्श्युरन्स (Motor Insurance) सारख्या नियमांमध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत.

हा कायदा लागू झाल्यानंतर तुमची एक छोटी चूक सुद्धा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) रद्द करू शकते.
यासाठी वाहन चालवताना या पाच गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
धोकादायक प्रकारे किंवा दारू पिऊन गाडी चालवण्यावर पहिल्या तुलनेत आवाढव्य दंड वसूल केला जात आहे.

– ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर असेल तर गाडी चालवू नका. पूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर सुद्धा लोक गाडी चालवत असत. परंतु आता नियम कडक केले आहेत.

– पॉल्यूशन सर्टिफिकेट, हेल्मेट आवश्यक आहे.

– वाहतूक अधिकार्‍यांशी गैरवर्तन, गाडी न थांबवणे, ट्रकच्या केबिनमध्ये प्रवाशी घेणे, दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द होऊ शकते, दंड होऊ शकतो.

– धुम्रपान करत गाडी चालवणे सुद्धा गुन्हा आहे.

– जास्त प्रवाशी भरल्यास दंड होऊ शकतो.

हे देखील वाचा

Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण

Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Driving License | these 5 mistakes on dussehra dhanteras and diwali then your driving license-will be canceled dl and rc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update