दारुच्या नशेत मुलाने केला 75 वर्षाच्या आईवर बलात्कार

आग्रा : वृत्तसंस्था – दारुच्या नशेत मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने दारुच्या नशेत आपल्या 75 वर्षाच्या आईवर बलात्कार केला. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने दारुच्या नशेत आपल्या पत्नी आणि सूनेसमोरच आईवर बलात्कार केला. आरोपीच्या सुनेने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीरकी या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. 45 वर्षीय अमर सिंह हा पत्नी, मुलगा आणि सूनेसोबत राहतो. त्याला दारुचे व्यसन आहे. बुधवारी रात्री अमर सिंहचा मुलगा घरात नव्हता. त्यावेळी तो दारु पिऊन घरी आला. तो खोलीत गेला आणि आईवर बलात्कार केला. आईने आरडाओरडा केल्यानंतर अमर सिंहची पत्नी आणि सून मदतीसाठी धावून गेली. मात्र खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने त्या काहीच करु शकल्या नाहीत.

या लज्जास्पद प्रकारानंतर सूनेने या घटनेची माहिती पोलिसांना फोन करुन दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अमर सिंह याला ताब्यात घेतले. आरोपीची पत्नी आणि सून या दोघी पीडितेला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी आरोपी अमर सिंह विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात केली. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.