Dry Fruits Prices | सण-उत्सवाच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका ! ड्राय फ्रूट्स खरेदीसाठी खिशावर येणार ‘भार’, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : Dry Fruits Prices | महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आता सणासुणीदीच्या काळात (Festive Season) आणखी झटका बसणार आहे. कोरोना व्हायरस महामारीसह इतर अंतरराष्ट्रीय घटनाक्रमांमुळे अमेरिकेतून (America) होणारी बदाम आणि पिस्ताची आयात प्रभावित झाल्याने दिवाळीत सुकामेव्याचे दर (Dry Fruits Prices) वाढू शकतात. तसेच, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कब्जा झाल्याने (Afghanistan Situation) सुद्धा भारतात सुकामेव्याच्या आयातीवर परिणाम होईल. देशात बहुतांश बदाम अमेरिका आणि अंजीर-मनुका अफगाणिस्तानमधूनच आयात केले जातात.

 

देशातील उत्पादनातून पूर्ण होईल काजूची मागणी

सुकामेव्याच्या घाऊक व्यापार्‍यांना ऑनलाइन प्लॅटफार्म उपलब्ध करून देणारी कंपनी ट्रेडब्रिज (Tradebridge) चे संचलन प्रमुख स्वप्निल खैरनार यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये झालेला घटनाक्रम आणि अमेरिकेतून आयात घटल्याने सुकामेवा महाग होत चालला आहे.

 

दिवाळीत दुसरा पर्याय निवडू शकतात लोक

मागील महिन्यापासून अफगाणिस्तानातून सुकामेव्याची आयात बंद आहे. मात्र, त्यांनी म्हटले की, काजूचा भाव जास्त वाढणार नाही कारण त्याची बहुतांश मागणी देशातील उत्पादनातून पूर्ण होते. आगामी दिवसाळीत सुकामेवा महाग झाल्यास लोक भेटीसाठी दुसर्‍या पर्याय निवडू शकतात.

 

20 दिवसात आयात सामन्य होण्याची अपेक्षा

काही व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, अटारी सीमेवरून अफगाणिस्तानच्या सुकामेव्याची आयात किरकोळ प्रकारे प्रभावित झाली आहे.
पुढील 15-20 दिवसात ती सामान्य होईल.

 

असे वाढले दर

अफगाणिस्तानमधून आयात होणार्‍या मोठ्या बदामचा किरकोळ दर 800 रुपये प्रति किलोग्रॅम आहे, जो मागील 20 दिवसात 50-60 रुपयांनी वाढला आहे.
तर, अंजीरचा दर 1,000 रुपयांवरून 1,200 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.
याशिवाय मनुका 100 रुपयांनी वाढून 600 रुपये प्रति किग्रॅ झाला आहे. तर काजू 800 रुपये प्रति किग्रॅवर स्थिर आहे.

Web Title : Dry Fruits Prices | prices of dry fruits will increase till festivals as reduced imports america afghanistan taliban will affect

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4,057 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra in corona | महाराष्ट्रात लागू कोरोना प्रतिबंधांमध्ये आणणार शिथिलता, CM उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या ‘या’ अटी

Male Infertility | लाईफस्टाइलसह इतर अनेक कारणांमुळे कमी होतेय पुरुषांची फर्टिलिटी, रिसर्चमध्ये खुलासा