डीएसकेंवरचा धडा वगळण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी .एस .कुलकर्णी यांचा धडा महाविद्यालयीन शिक्षणात समाविष्ट केला गेला होता. पण काही दिवसांपूर्वीच करोडोंचा गंडा घालणारे बांधकाम व्यावसायिक कुलकर्णी येरवाडा जेल मध्ये तुरुंगवास भोगत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अखेरीस डीएसकेंवरचा धडा एफवायबीकॉम आणि टीवायबीकॉमच्या अभ्यासक्रमातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यर्थ्यांना समाजातील आदर्श उद्योजक,व्यक्ती यांच्यासंदर्भातील धड्यांचा समावेश पाठयपुस्तकात केला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमात ‘वास्तू उद्योगाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी’ अशा मथळ्याखाली एक धडा आहे. हे पुस्तक १५ जून २०१३ साली छापण्यात आले होते आता खुद्द डीएसकेच आरोपी आहेत त्यामुळे, या पुस्तकातील धड्याचे करायचे काय असा प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रशासनाला निर्माण झाला होता.

जाहिरात

आता डीएसके यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी अनेक आरोप झाले आहेत . सध्या ते येरवडा येथील कारागृहात आहेत . त्यामुळे मुलांनी पाठयपुस्तकातील धड्यातून काय शिकायचं, काय बोध घ्यायचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी केली होती . राज्य सरकारने हा धडा नाही तर पूर्ण पुस्तक मागे घ्यावं, त्याची पुनर्तपासणी करावी अशी मागणीही टकले यांनी केली होती . त्यावरून आता पुणे विद्यापीठाने डीएसकेंवरचा धडा एफवायबीकॉम आणि टीवायबीकॉमच्या अभ्यासक्रमातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात

असे आहेत आरोप

डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल २ हजार ४३ कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार ८७५ पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना १७ फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर डीएसकेंच्या मेहुणीलाही अटक झाली.

[amazon_link asins=’B072MFVNML,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e97bb151-af67-11e8-ae98-73e6d9b509f8′]