Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा पहिला बळी ! YCM हॉस्पीटलमध्ये 45 वर्षीय पुरूषाचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड परिसरात कोरनाचे रुग्ण आढळून येत आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मत्यू झाला आहे. या व्यक्तीवर पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड शहारमधील कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली असून 12 जण बरे झाले आहेत. तर 18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 1 रुग्ण खडकी येथील असून बाकी तीन रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात सध्या 15 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मागील पाच दिवसांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मागील चार दिवसात 10 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या एका नर्सचा समावेश आहे. तिची कोरोनाचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिच्या पतिमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचा आज रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना वायसीएम रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आज पर्य़ंतची संख्या 2048 असून त्या सर्वांना किमान 14 दिवसांसाठी व आवश्यक भासल्यास पुढील 28 दिवसांपर्य़ंत घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सुचनांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्यात येणार आहे.