Shivsena | …शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देताना यावर्षीच दिरंगाई का? सुनिल प्रभूंनी केले हे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena | दसरा मेळाव्याला परंपरा म्हणून प्रत्येक शाखेतून शिवसैनिक (Shivsainik) मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर येत असतात. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा (Dussehra festival) होते. तेथे विजयादशमीनिमित्त शस्त्रांचे पूजन केले जाते. संस्कृतीचे जतन केले जाते. विचारांचे सोने लुटले जाते. या कार्यक्रमाला आतापर्यंत परवानगी मिळालेली आहे. यावेळीदेखील परवानगी मिळालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे वक्तव्य शिवसेना (Shivsena) नेते सुनिल प्रभू यांनी केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत येतात. मात्र, पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गटाने पक्ष, पक्षचिन्ह आणि आता दसरा मेळाव्यावर सुद्धा हक्क सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, कामाला लागा, असे आदेश शिवसैनिक आणि नेत्यांना दिले आहेत.

 

आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, कामाला लागा, असे आदेश या बैठकीत दिले. आता शिवसेना नेते सुनिल प्रभू यांनीही दसरा मेळाव्या संबंधी मोठे भाष्य केले आहे. (Shivsena)

सुनिल प्रभू म्हणाले, पालिकेने कितीही टाळाटाळ केली तरी मागील अनेक वर्षांचा संदर्भ घेतल्यानंतर शिवसेनेलाच ही परवानगी द्यावी लागलेली आहे. संस्कृतीचे जतन करत असलेले पक्ष तसेच संस्था यांना कायदा व सुव्यवस्था पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक मोठ्या संख्येने तसेच शिस्तीने शिवाजी पार्कवर येणार आहेत.

 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मेळाव्यासाठीची परवानगी मिळण्याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे.
त्यानंतर याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले आहे.
यावर्षी असे काय झाले की परवानगी देण्यासाठी दिरंगाई होत आहे? असा प्रश्न प्रभू यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Shivsena | shivsena leader sunil prabhu said shivsena dussehra melawa will be on shivaji park

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)