DySP Dalbir Singh | नवीन वर्षाच्या सिलिब्रेशननंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, मिळाला होता अर्जुन पुरस्कार

चंदिगड : वृत्तसंस्था – DySP Dalbir Singh | अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) सुवर्णपदक विजेता पंजाब पोलीस अधिकारी वेटलिफ्टर दलबीर सिंग (DySP Dalbir Singh) यांची गोळ्या झाडून (Firing) हत्या (Murder) करण्यात आली. दलबीर सिंग हे सोमवारी जालंधरमध्ये बस्ती बावा खेल येथील एका रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळले. ते पंजाब सशस्त्र पोलीस (PAP) मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक (DySP) म्हणून तैनात होते. स्थानिक लोकांसोबत त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दलबीर सिंग (DySP Dalbir Singh) यांची जालंधरच्या एका गावातील लोकांशी वादवादी झाली होती. तेथील लोकांनी लायसनच्या रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला होता. दुसऱ्या दिवशी या गावातील लोकांसोबत असलेला वाद मिटवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर दलबीर यांची हत्या का झाली असा प्रश्न पडला आहे.

अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करुन एक मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता, त्यांना डीएसपी दलबीर सिंग असल्याचे समजले. त्यांच्या डोक्यात जखम होती. सुरुवातीला पोलिसांना रस्ते अपघात झाल्याचे वाटले. मात्र, त्यांच्या मानेत बंदुकीची गोळी असल्याचे शवविच्छेदनात समोर आले. तसेच दलबीर सिंग यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर (Service Revolver) देखील गायब आहे. त्यामुळे हत्येचा संशय बळावल्याचे एडीसीपी बलविंदर सिंग रंधावा (Add SP Balwinder Singh Randhawa) यांनी सांगितले.

याबाबत दलबीर सिंग यांच्या मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. नववर्षाच्या रात्री दलबीर सिंग यांना बस स्टँडच्या
पाठिमागे सोडल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे गार्ड सोबत नव्हते. यामुळे पोलीस बस स्टँडच्या आजुबाजूचे सीसीटीव्ही
फुटेज तपासत आहेत. कुटुंबियांचीही चौकशी केली जात आहे.
दलबीर सिंग हे प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना 2000 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Bhandara Sunflag Steel Company Blast | सनफ्लॅग कंपनीतील भीषण स्फोटाने भंडारा हादरला; ८ कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR