पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आणखी एका ‘एसीपी’ची नियुक्‍ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजाराम रामराव पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

राजाराम रामराव पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आहेत. तर त्यांची आज नव्याने तयार झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आय़ुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. तसेच त्यांना तात्काळ पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी गाईचे दूध चांगले की म्हशीचे ?

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी