E Verification Scheme 2021 | आयकर संचालनालय व ‘आयसीएआय’ यांच्यातर्फे ‘ई-व्हेरिफिकेशन स्कीम-२०२१’ वर आउटरीच प्रोग्राम ! ‘ई-व्हेरिफिकेशन’ करदात्यांसाठी लाभदायक – सुनीता बैंसला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – E Verification Scheme 2021 | “करदात्यांच्या संपत्तीची आणि विवरणपत्रात दिलेली माहिती यांची खातरजमा करण्यासाठी ‘ई-व्हेरिफिकेशन स्कीम-२०२१’ (E Verification Scheme 2021) करणे करदात्यांसाठी लाभदायक आहे. माहितीत तफावत असल्यास आयकर विभागाकडून नोटीस (Income Tax Department Notice) बजावली जाते. अशी नोटीस आल्यास करदात्यांनी सनदी लेखापालांचे मार्गदर्शन घ्यावे आणि त्वरित त्याला प्रतिसाद द्यावा,” असे आवाहन नवी दिल्ली येथील मुख्य आयकर महासंचालक (इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्वेस्टीगेशन) सुनीता बैन्सला (Sunita Bainsla) यांनी केले.

 

आयकर संचालनालय (इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्वेस्टीगेशन) आणि दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ई-व्हेरिफिकेशन स्कीम २०२१’वर आयोजित आउटरीच प्रोग्रॅममध्ये बैन्सला बोलत होत्या. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्रधान मुख्य आयकर आयुक्त (पुणे) प्रवीण कुमार, पुण्यातील आयकर संचालक (इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्वेस्टीगेशन) राजीव कुमार, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे (CA Chandrashekhar Chitale), आयसीएआय पुणेचे (ICAI Pune) अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल (CA Rajesh Agrawal), उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी (CA Amruta Kulkarni), सचिव सीए अजिंक्य रणदिवे (CA Ajinkya Ranadive), खजिनदार सीए ऋषिकेश बडवे (CA Hrishikesh Badve), कार्यकारिणी सदस्य सीए काशिनाथ पठारे (CA Kashinath Pathare), सीए प्रणव आपटे (CA Pranav Apte) आदी उपस्थित होते. (E Verification Scheme 2021)

 

सुनीता बैंसला म्हणाल्या, “आयकर विवरणपत्र भरताना अनेकदा माहितीमध्ये त्रुटी असल्याचे आढळून येते. अशा करदात्यांना विभागाकडून नोटीस बजावली जाते. करदात्यांना सुधारित विवरणपत्र भरता येते किंवा संबंधित आर्थिक व्यवहार, संपत्ती आपली नसल्याबद्दल खुलासा करता येतो. ‘ई-व्हेरिफिकेशन’ केल्यास आपण भरलेले विवरणपत्र योग्य असल्याचे समजू शकते. आपल्या आर्थिक व्यवहारांचे मूल्यांकन होते.”

प्रवीण कुमार म्हणाले, “ही योजना चौकशी करण्यासाठी नाही, तर करदात्यांना मूल्यांकन व दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आहे. कर योग्यरीत्या भरला आहे की नाही, हे तपासता येते.
याबाबत करदात्यांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी आयकर विभागाने सनदी लेखापालांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजिला आहे.”

 

राजीव कुमार यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून ‘ई-व्हेरिफिकेशन’बाबत सविस्तर माहिती दिली.
सीए चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले की, करदात्यांना आणि सनदी लेखापालांना नव्या योजना,
नियम व तरतुदी यांची माहिती व्हावी, यासाठी सातत्याने ‘आयसीएआय’तर्फे जागृतीपर कार्यक्रम राबवले जातात.
सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत प्रास्ताविक केले.
सीए ऋषिकेश बडवे यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

Web Title :  E Verification Scheme 2021 | Outreach Program on ‘E-Verification Scheme-2021’
by Directorate of Income Tax and ‘ICAI’! ‘E-verification’ beneficial for taxpayers – Sunita Bainsla

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा