Har Ghar Savarkar | ‘हर घर सावरकर’ समिती तर्फे 27 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन; ‘मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी’ हा विशेष कार्यक्रम

पुणे पोलीसनामा ऑनलाइन – Har Ghar Savarkar | हर घर सावरकर समिती तर्फे “हर घर सावरकर” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे व याची सुरुवात दि. २१ मे २०२३ रोजी किल्ले रायगड येथे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत आणि मा. आमदार भरतजी गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमापासून झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती लिहिली आहे त्यामुळे या अभियानाची सुरुवात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन करण्यात आली. या कार्यक्रमात हर घर सावरकर समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हर घर सावरकर समितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मार्गदर्शन लाभले आहे. (Har Ghar Savarkar)

समितीतर्फे पुढील वर्षभरात राज्यभरात वर्षभरात एकूण ७५ कार्यक्रम राबवले जाणार आहेत व त्यातील पहिले पुष्प “मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी” हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २७ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे व हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तर प्रमुख वक्ते श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्यासह लेखिका सौ. शेफाली वैद्य आणि सावरकर अभ्यासक श्री. अक्षय जोग यांचे विचार सावरकरप्रेमींना ऐकायला मिळणार आहेत. हर घर सावरकर समितीचे सात्यकी सावरकर आणि देवव्रत बापट कार्यक्रमाचे आयोजक आहेत तसेच कार्यक्रमाला महाराष्ट्र टुरिझम, मृत्युंजय प्रकाशन आणि विवेक व्यासपीठ यांचे सहकार्य लाभले आहे. (Har Ghar Savarkar)

 

 

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे व याच्या प्रवेशिका दि. २४ मे पासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,
बालगंधर्व रंगमंदिर व ग्राहक पेठ, टिळक रोड येथे उपलब्ध होतील.
काही जागा राखीव असलेल्या या कार्यक्रमाला प्रवेशिका अनिवार्य आहे
त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी १५ मिनिटे प्रवेशिकेसह सर्व सावरकरप्रेमींनी उपस्थित राहावे
असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

 

Web Title :  Har Ghar Savarkar | Organized a special program by ‘Har Ghar Savarkar’
Committee on May 27 on the occasion of the birth anniversary of freedom fighter Savarkar;
A special program ‘Moplyanche Bund Te Kerala Story’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा