Earn Money | दरमहिना पाहिजे असेल मोठी कमाई तर मोफत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्ही दरमहिना जादा उत्पन्न (Extra income) मिळवण्याच्या शोधात असाल तर आम्ही एक असा व्यवसाय सांगणार आहोत, जिथे तुम्ही थोडे पैसे लावून मोठी कमाई (Earn money) करू शकता. होय, हा व्यवसाय आधार कार्डसंबंधीत आहे. आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र असून यात माहिती अपडेट करण्यासाठी लोकांची आधार केंद्रावर नेहमीच गर्दी असते. तुम्ही सुद्धा आधार कार्ड केंद्राची फ्रेंचायजी (Aadhaar Card Franchise) घेऊ शकता. याबाबत जाणून घेवूयात.

 

 

जाणून घ्या कसे करावे अप्लाय ?

– प्रथम NSEIT ची वेबसाइट https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action वर जा.

येथे Create News User च्या ऑपशनवर क्लिक केल्यावर नवीन फाइल उघडेल.

येथे Share Code enter साठी सांगितले जाईल. Share Code साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करना होगा.

डाऊनलोड झाल्यानंतर XML File आणि Share Code डाऊनलोड होईल.

अप्लाय करताना एक फॉर्म उघडेल. यात माहिती भरून तो सबमिट करा.

फोनवर आणि ई-मेल आयडीवर USER ID आणि Password येईल. याद्वारे Aadhaar Testing and Certification च्या पोर्टलवर लॉगईन करू शकता. यानंतर Continue चा पर्याय येईल, त्यावर क्लिक करा.

पुढील स्टेपमध्ये तुमच्या समोर एक फॉर्म पुन्हा उघडेल. यामध्ये सर्व माहिती भरा. नंतर फोटो आणि डिजिटल हस्ताक्षर अपलोड करा. नंतर Proceed to submit form वर क्लिक करा.

 

– शेवटी येथे करा पेमेंट

वर दिलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. यासाठी तुम्हाला वेबसाइटच्या Menu मध्ये जाऊन पेमेंट ऑपशनवर क्लिक करावे लागेल. (Earn Money)

पेमेंट केल्यानंतर Please Click Here to generate receipt वर क्लिक करून रिसिट डाऊनलोड करू शकता.

 

सेंटर बुक करण्याची प्रक्रिया

सर्व माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तुम्ही जेव्हा पुन्हा लॉग इन कराल तेव्हा Book Center वर क्लिक करून आपल्या जवळच्या सेंटरची निवड करू शकता.

यानंतर तुमची याच्याशी संबंधीत परीक्षा घेतली जाईल. यानंतर तुम्हाला तारीख आणि वेळ सांगावी लागेल की तुम्ही केव्हा परीक्षा देण्यासाठी उपलब्ध असाल. नंतर तुम्हाला काही वेळाने Admit Card मिळेल, जे डाऊनलोड करून तुम्ही प्रींट घेऊ शकता.

 

Web Title :- Earn Money | business opportunity start aadhaar card franchise business and monthly earn money check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime | मिरजमध्ये पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकाचा खून; तीन जणांना अटक

Devendra Fadnavis | IT च्या छाप्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी साधला अजित पवारांवर निशाणा, केले गंभीर खुलासे; म्हणाले…

Pune Crime | दुकान मालकाकडून 30 वर्षीय महिलेचा विनयभंग ! दिले सिगारेटचे चटके, FIR दाखल