Sangli Crime | मिरजमध्ये पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकाचा खून; तीन जणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | मिरज (miraj) तालुक्यातील हरिपूर येथे पूर्ववैमनस्यातून ट्रक चालकाच्या डोक्यात दगडी पाटा घालून, काठी, दांडके आणि चाकूने वार करत निर्घृण खून केल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. विक्रम रमेश वाघमारे Vikram Ramesh Waghmare (वय 35) असे खून झालेल्याचे (Sangli Crime) नाव आहे.

 

 

खूनप्रकरणी आप्पासाहेब दिनकर पिंगळे (वय 54), राहुल आप्पासाहेब पिंगळे (वय 30) आणि लता आप्पासाहेब पिंगळे (वय 50, सर्व रा. पिंगळे मैदान, हरिपूर, ता. मिरज) यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली सर्व हत्यारे जप्त केली आहेत. याप्रकरणी सोनाली विक्रम वाघमारे (Sonali Vikram Waghmare) यांनी फिर्याद (Sangli Crime) दिली आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरात तणापूर्ण शांतता होती.

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आप्पासाहेब पिंगळे वीट विक्री एजंट आहेत. त्यांचा मुलगा राहूल आणि विक्रम दोघे मित्र होते. 2016 मध्ये विक्रमने पिंगळे कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केला होता. त्या प्रकरणी राहुल याने विक्रम याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तो गुन्हा न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान गुन्हा मागे घेण्यासाठी विक्रमने पिंगळे कुटुंबाकडे तगादा लावला होता. यावरून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती.

 

 

शनिवारीही विक्रम हे प्रकरण मिटवण्यासाठी पिंगळे यांच्याकडे गेला होता. त्यावेळी जोराचा वाद झाला.
अखेर तिघांनी विक्रम याला काठीने, दांडक्याने मारहाण केली. मुख्य संशयित आप्पााहेब पिंगळे याने दगडी पाटा विक्रम याच्या डोक्यात घातला.
यामध्ये विक्रमचा मृत्यू झाला. आप्पासाहेब पिंगळे हा रक्ताने माखलेल्या कपड्यांसह पोलीस ठाण्यात हजर झाला.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक अजित टिके (SDPO Ajit Tike), पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड (Police Inspector Shivajirao Gaikwad)
यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच राहुल आणि खुनात सहभाग असण्याच्या शक्यतेने लता यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

Web Title :- Sangli Crime | Murder of truck driver out of prejudice in Miraj; Three arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | IT च्या छाप्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी साधला अजित पवारांवर निशाणा, केले गंभीर खुलासे; म्हणाले…

Pune Crime | दुकान मालकाकडून 30 वर्षीय महिलेचा विनयभंग ! दिले सिगारेटचे चटके, FIR दाखल

UPSC ची तयारी करणार्‍या ‘आकांक्षा’ने केली गळफास घेऊन केली आत्महत्या