Earn Money | नोकरीची चिंता सोडून 2 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल 1 लाखाची कमाई; सरकार देईल. 4 लाख रुपयांची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही मोदी सरकारच्या मुद्रा योजनेचा (Mudra Scheme) लाभ घेऊ शकता. या अंतर्गत तुम्हाला 4 लाख रुपयांचे लोन स्वस्त व्याजदरात मिळेल. हा बिझनेस पापड बनवण्याचा (Papad Making Business) आहे. पापड उद्योग केवळ 2 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन (National Small Industries Corporation, NSIC) ने यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे, ज्याद्वारे तुम्हाला मुद्रा स्कीम (Mudra Scheme) अंतर्गत 4 लाख रुपयांचे लोन स्वस्त दरात मिळू (Earn Money) शकते.

या बिझनेसबाबत जाणून घ्या सर्वकाही
या रिपोर्टनुसार, 6 लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीतून सुमारे 30 हजार किलोग्रॅमची प्रोडक्शन कॅपॅसिटी तयार होईल. हा बिझनेस सुरू करण्यासाठी 6.05 लाख रुपये खर्च होईल. एकुण खर्चात फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलच्या खर्चाचा समावेश आहे.

फिक्स्ड कॅपिटलमध्ये दोन मशिन, पॅकेजिंग मशीन इक्विपमेंट सारख्या खर्चांचा समावेश आहे. वर्किंग कॅपिटलमध्ये स्टाफचा तीन महिन्याचा पगार, तीन महिन्यात लागणारा कच्चा माल आणि युटिलिटी प्रॉडक्टच्या खर्चाचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये भाडे, वीज, पाणी, टेलीफोन बिल सारख्या खर्चांचा समावेश आहे.

 

या मशिन्सची आहे आवश्यकता

पापड उद्योग सुरू करण्यासाठी स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लॅटफॉर्म बॅलन्स, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओव्हन, मार्बल टेबल टॉप, पोळीपाट लाटणे, अ‍ॅल्युमीनियमची भांडी आणि रॅक्स सारखी मशनरी आवश्यक आहे.

250 स्वेअर फुट जागा आवश्यक
पापड उद्योगासाठी किमान 250 स्क्वेअर फुट जागेची आवश्यकता आहे. स्वताची जागा नसेल तर भाड्याने घेऊ शकता. ज्यासाठी किमान 5 हजार रुपये भाडे द्यावे लागेल. मॅनपावरमध्ये तीन अनस्किल्ड लेबर, दोन स्किल्ड लेबर, एक सुपरवायझरची आवश्यकता असेल. या सर्वांच्या सॅलरीवर 25,000 रुपये खर्च होतील जे पार्किंग कॅपिटलमध्ये धरले आहेत.

स्वताला लावावे लागतील 2 लाख रुपये
6 लाख रुपयांच्या एकुण भांडवलापैकी 2 लाख रुपये तुम्हाला लावावे लागतील.
सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत सरकारी बँकेतून 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
कर्ज रक्कम पाच वर्षात परत करावी लागेल.

किती होईल कमाई
प्रॉडक्ट बनवल्यानंतर ते घाऊक विकावे लागेल.
यासाठी छोटे किराणा स्टोअर आणि सुपर मार्केट आणि मोठे रिटेलर यांच्याशी संपर्क करून सेल वाढवता येईल.
एका अंदाजानुसार पापड उद्योगात नफा गुंतवणुक रक्कमेचा पाचवा भाग असतो.
जर तुम्ही 5 लाख रुपये लावले तर दरमहिना तुम्हाला 1 लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
यामध्ये तुमचे प्रॉफिट 35-40 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते.

Web Titel :- Earn Money | business opportunity start papad making business with rs 2 lakh and earn 1 lakh rupees per month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन्पो लिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

Earn Money | अतिशय कमी पैशात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, महिना 2 लाखापर्यंत होईल कमाई; सरकार सुद्धा करते मदत

Gujrat New CM | गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण ? चर्चेला पूर्ण विराम, भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब