Gujrat New CM | गुजरातचा नवीन मुख्यमंत्री कोण ? चर्चेला पूर्ण विराम, भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

गांधीनगर : वृत्तसंस्था – Gujrat New CM | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी राजीनामा दिल्या आणि मोठा राजकीय भुकंप झाला. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री (Gujrat New CM) कोण यावर चर्चा रंगू लागल्या. निपाणी यांनी राजीनामा का दिला अशी चर्चा सुरु असतानाच भाजपच्या (BJP) दीर्घकाळ चालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल (Bhupendra Rajnikanth Patel) यांची एकमताने निवड करण्यात आली. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे

भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने पाटीदार समजाकडे गुजरातचं मुख्यमंत्रीपद गेलं आहे. तसेच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी ऑगस्ट 2016 मध्ये आनंदीबेन पटेल (Anandiben Patel) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल त्यांची जागा घेतील अशी चर्चा होती. मात्र, त्यावेळी देखील त्यांना डावलून रुपाणी यांची निवड करण्यात आली होती.

विजय रुपाणी यांचे उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री नितीन पटेल, कृषीमंत्री आर.सी. फाल्दु, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांची नावे चर्चेत होती. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत भुपेंद्र पटले यांचे नाव निश्चित करण्यात आले. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी ही घोषणा केली.

Web Titel :- Gujrat New CM | bhupendra patel will be the chief minister of gujarat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची गोष्ट ! 2 लाख रुपये गुंतवून ‘या’ कंपनी सोबत सुरू करा बिझनेस, दरमहा होईल 5 लाखांची कमाई, जाणून घ्या

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गोप्यस्फोट, म्हणाले – ‘ठाकरे सरकारमधील आणखी 2 मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार’

PM kisan Samman Nidhi | 6,000 रुपये आणि इतर फायदे घेण्यासाठी या सरकारी अ‍ॅपद्वारे करा रजिस्ट्रेशन