‘कोलेस्ट्रॉल’ नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘अशी’ 8 प्रकारे घ्या काळजी, अन्यथा होतील ‘गंभीर’ आजार

पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीवरील तेलाच्या जाहिरातींमध्ये लो-कोलेस्ट्रॉलयुक्त खाद्यतेलाचा वारंवार उल्लेख केला जातो. तसेच डॉक्टरसुद्धा हृदयरोग्यांना तेल कमी खाण्याचा सल्ला देतात. कारण कोलेस्ट्रॉल वाढल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढू द्यायचे नसतील तर सतत काळजी घेणे खुप आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे, योग्य पदार्थांचा आहारात समावेश करणे, इत्यादी प्रकारची काळजी घेतली पाहिजे. भविष्यातील गंभीर आजार टाळायचे असतील हे खुप महत्वाचे आहे. जाणून घेवूयात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी…

अशी घ्या काळजी

1 चहा, कॉफी, मिल्क शेक प्या. यासाठी लो फॅट दूध वापरा.

2 क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादने टाळा.

3 कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

4 भाज्यांमध्ये कमी तेल वापरा.

5 उकडलेल्या भाजा खा. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

6 अंड्यातील पिवळा बलक खाणे टाळा.

7 अंड्याच्या सफेद भागात प्रोटिन ते शरीरासाठी फायदेशीर असल्याने खाऊ शकता.

8 जंक फूड टाळा. यामुळे कोलेस्ट्रॉल जलद वाढते.