ED | अजित पवारांना पुन्हा धक्का ! जगदीश कदम यांच्या निवासस्थानी ED ची धाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ED | मागील काही दिवसांपुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. यानंतर आता अजित पवार यांना धक्का देणारी आणखी एक माहिती समोर येत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) अजित पवार (Ajit Pawar) यांचे मावस भाऊ जगदीश कदम (Jagdish Kadam) यांच्या घरी धाड टाकली आहे. दौंड शुगर्स व जरंडेश्वर साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याचं म्हटल जात आहे.

 

भाजपचे जेष्ट नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) देखील दौंड सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर 7 ऑक्टोबर रोजी इन्कम टॅक्सकडून कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईनंतर आता ईडीने आज (गुरुवारी) कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीने (ED) जगदीश कदम यांच्या निवासस्थानी धाड टाकली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान, अजित पवार यांचे मावस भाऊ असलेले जगदीश कदम (Jagdish Kadam) हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.
त्यांच्या घरी आज (गुरूवारी) सकाळी ईडीचे अधिकारी पोहोचले व झाडाझडती सुरू केली.
जगदीश कदम हे सध्या मुंबईत असून ईडीच्या (ED) धाडीची माहिती मिळताच ते पुण्याला निघाले असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- ED | ajit pawar ed raid at his cousin jagdish kadam house in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात विद्युत परिवहनकडून अल्‍टीग्रीनसह लास्‍ट-माइल डिव्हिलरी सर्विसेसचा शुभारंभ

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर (व्हिडिओ)

Isha Ambani | ईशा अंबानी यांची ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर नियुक्ती