Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला ईडीचे समन्स; 2 दिवस होणार चौकशी

मुंबई न्युज (Mumbai news)  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी ईडी (ED) च्या चौकशीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर पुन्हा एकदा ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Anil Deshmukh’s son Rishikesh Deshmukh) यालाही समन्स (Summons) बजावत ईडीने मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान यापूर्वीही दोनवेळा प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे कारण देत अनिल देशमुख उपस्थित राहिले नव्हते मात्र त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी खंडणी मगितल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. दरम्यानच्या काळात ईडीने देशमुखांच्या घरी छापे मारले होते. यानंतर ईडीने त्यांना तीन समन्स पाठविले होते. गेल्या मंगळवारी त्यांना सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली. वय, आजारपण आणि कोरोनाच कारण पुढं करत ईडी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्यास नकार दिला. दरम्यान, त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी दर्शवली होती. पण त्यावर काही झाले नाही. ईडीकडे अनिल देशमुख यांच्या वकीलांनी ८ दिवसांची मुदत मागितली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : ed has summoned former maharashtra home minister anil deshmukh questioning july

हे देखील वाचा

Pune Crime News | अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍यास ‘ढोंगी बुवा’ अन् महिलेनं संपवलं; पुण्याच्या कात्रज घाटात फेकला मृतदेह

Pune News | ठाकरे सरकारसाठी नामुष्की ! MPSC परीक्षा पास होऊनही नोकरी नाही, तणावातून स्वप्नील लोणकरची आत्महत्या; जाणून घ्या

20 Rupees Note | जर तुमच्याकडे आहे Rs 20 ची Note तर घरबसल्या कमावू शकता हजारो, जाणून घ्या पद्धत