ED Raid | गुंतवणुकीच्या आमिषाने 100 कोटींची फसवणूक, पुण्यातील व्हीप्स समूहाविरुद्ध ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ED Raid | बनावट कंपनी (Fake Company) स्थापन करून गुंतवणुकीच्या (Investment) आमिषाने राज्यभरातील गुंतवणूकदारांची शंभर कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने Enforcement Directorate (ईडी – ED) पुण्यातील व्हीप्स या समूहाविरोधात मनी लॉड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा दुबईस्थित मालक विनोद खुटे याच्यावर यापूर्वी देखील परदेशी विनिमय चलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी ईडीने केलेल्या छापेमारीत 28 कोटी 60 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (ED Raid)

उपलब्ध माहितीनुसार, विनोद खुटे याने क्रिप्टो करन्सी (Crypto Currency), पेमेंट वॉलेट सर्व्हिस (Payment Wallet Service) आणि परदेशी चलनाचे अवैध व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासाठी त्याने अनेक गुंतवणूकदारांकडून भारतीय चलनात पैसे गोळा केले होते. गुंतवणुकदारांना प्रत्येक महिन्याला दोन ते तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दिले होते. विशेष म्हणजे त्याने अमेरिकी डॉलर या चलनामध्ये हा परतावा देण्याचे आमिष दिले होते. (ED Raid)

कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपीने गुंतवणूकदारांना दाखविले होते.
राज्यभरातील गुंतवणूकदारांनी या कंपनीत पैसे गुंतवले होते. आरोपींनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले.
ही रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली नाही. आरोपींनी बनावट नावाने बँकेत खाते काढले होते.
या खात्यात गुंतवणूकदारांकडून गोळा केलेली रक्कम जमा करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी बंद करून आरोपी पसार झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

वारजे परिसरात कोयता गँगची पुन्हा दहशत, भरदिवसा सार्वजनिक रोडवरील 12 वाहनांच्या काचा फोडल्या; सराईत गुन्हेगारसह दोघांना अटक