Pune Crime News | वारजे परिसरात कोयता गँगची पुन्हा दहशत, भरदिवसा सार्वजनिक रोडवरील 12 वाहनांच्या काचा फोडल्या; सराईत गुन्हेगारसह दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | काही दिवसांपूर्वी वारजे येथील जय भवानी चौकातील तीन दुचाकी पेटवून दिल्या. तसेच एक अॅटो रिक्षा आणि वॅगनर कारची काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली होती. त्यानंतर कोयता गँगने (Koyta Gang) पुन्हा 12 वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.20) दुपारी दीड ते पावणे दोनच्या दरम्यान यशोदीप चौकाकडून विठ्ठल नगर चौकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर घडली. पुणे शहरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Pune Crime News)

याबाबत अभिजीत बिभीशन धावने (वय-30 रा. त्रिमुर्ती सोसायटी, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. अविनाश सुरेश गंपले उर्फ अव्या Avinash Suresh Gumple alias Avya (रा. महादेवनगर, वारजे), सतीश पवन राठोड Satish Pawan Rathore (वय-18) यांना अटक केली असून अविनाश गंपले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर विशाल संजय सोनकर (वय-19) व एकावर आयपीसी 392, 336, 323, 427, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी धानवे हे त्यांच्या वडिलांना आणण्यासाठी त्यांच्या चारचाकी गाडीत बसले होते. त्यावेळी आरोपींनी दुचाकीवरुन येऊन धानवे यांच्या गाडीच्या आरशावर कोयता मारुन आरसा तोडला. याचा जाब विचारला असता आरोपींनी फिर्य़ादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) केली. तसेच हातातील कोयत्याचा धाक दाखवून फिर्य़ादी यांच्या पँन्टच्या खिशातून जबदस्तीने चार हजार रुपये काढून घेतले.

आरोपींनी परिसरात दहशत माजवण्यासाठी रस्त्यावरील 12 चारचाकी गाड्यांच्या काचा कोयता व बांबूने फोडल्या.
तसेच आजुबाजुला राहणाऱ्या लोकांच्या घराच्या खिडकिवर दगडफेक करुन नुकासान केले.
भरदिवसा सार्वजनिक रोडवर हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलीस ठाण्याती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील धक्कादायक घटना! बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर 3 आरोपींकडून लैंगिक अत्याचार