सर्वसामान्यांना बसणार झटका ! भाज्या आणि फळांनंतर आता ‘या’ कारणामुळं महाग होऊ शकतं खाद्यतेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरससह आता लोकांना महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे. त्याचा परिणाम येत्या काळात आपल्या स्वयंपाकघरात दिसून येईल, ज्यामुळे बजेट बिघडू शकते. एका वृत्तसंस्थेनुसार, केंद्र सरकार खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवण्यावर विचार करत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन उघडल्यानंतर फळ आणि भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताची घोषणा करून ते वाढवण्यावर भर दिला होता. आयात शुल्कात वाढ करून देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे.

खाद्यतेलांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवायची सरकारची इच्छा आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, रोजगाराच्या संधी वाढतील तसेच देशाचे आयात बिलही कमी होईल.

सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बी.व्ही. मेहता यांनी माध्यमांना सांगितले की, सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर आळा घालण्यासाठी आणि देशात तेलबिया उद्योग वाढवण्यासाठी सल्ला मागितला आहे. आम्ही तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी अनेक सूचनाही दिल्या आहेत.

ही आहे सरकारची योजना
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देश मलेशियातून पाम तेलाची आयात करते, जर सरकारने कर वाढवला तर किंमत वाढल्यामुळे त्याची आयात कमी होईल. ज्यामुळे मोहरी, सोयाबीन आणि शेंगदाणा तेलबियांची मागणी वाढेल, मागणी वाढताच त्याचे उत्पादन वाढेल. या करातून येणाऱ्या पैशाचा वापर देशातील तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. आणखी एका सरकारी अधिकारी आणि उद्योग सूत्राने म्हटले की, करात ५ टक्के वाढ केली जाऊ शकते.

भारत प्रत्येक तेलाच्या आयातीवर खर्च करतो इतके अब्ज डॉलर
देशातील खाद्यतेलांची आयात काही वर्षांपासून वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. एकूण वापरापैकी सुमारे ७० टक्के खाद्यतेल आयात केले जात आहे. ज्यावर वर्षाकाठी सुमारे १० अब्ज डॉलर्स खर्च होतात. दुसरीकडे भारतातील मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या कच्च्या तेलावर ३५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. तर रिफाईंड पाम तेलावर ३७.५ टक्के आणि रिफाइंड तेलावर ४५ टक्के आयात शुल्क आहे.