Edible Oil Price | मोदी सरकारच्या बैठकीनंतर निर्णय, खाद्यतेल होईल इतके स्वस्त!

नवी दिल्ली : Edible Oil Price | महागाईने (Inflation) हैराण झालेल्या जनतेला येत्या काही दिवसांत दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमती (Edible Oil Price) कमी होऊ शकतात. अन्न आणि ग्राहक मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल प्रोसेसर आणि उत्पादकांनी तेलाच्या किमती कमी करण्याचे मान्य केले आहे. परदेशी बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरल्यानंतर देशांतर्गत किमतीत कपात करणे अपेक्षित आहे. घसरलेल्या किमतींचा लाभ घरगुती ग्राहकांनाही मिळावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
10 ते 12 रुपयांनी होऊ शकते स्वस्त
वृत्तानुसार, जागतिक बाजारपेठेत किमती नरमल्यानंतर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यास तेल उत्पादकांनी सहमती दर्शवली आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किरकोळ किमती 10-12 रुपयांनी कमी होऊ शकतात. मात्र, गेल्या महिन्यातही तेल उत्पादक कंपन्यांनी दरात कपात केली होती. परंतु मंत्रालयाचे मत आहे की, जागतिक किमतीत घसरण झाल्यानंतर किमती आणखी कमी होण्यास वाव आहे. (Edible Oil Price)
मागील महिन्यात कमी झाला होता दर
जुलैमध्ये खाद्यपदार्थ उत्पादक कंपनी अदानी विल्मर (Adani Wilmar) ने खाद्यतेलाच्या किमतीत प्रति लिटर 30 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अदानी विल्मरने एका निवेदनात म्हटले होते की, जागतिक किमतीतील घसरण लक्षात घेऊन कंपनीने कमी दरात खाद्यतेल (Edible Oil) ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कपात केली आहे.
या कारणामुळे परदेशी बाजारात वाढले होते भाव
भारत आपल्या स्वयंपाकाच्या तेलाच्या दोन तृतीयांश आयात करतो. अलिकडच्या काही महिन्यांत, रशिया-युक्रेन युद्ध आणि इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, इंडोनेशियाने अलीकडच्या काही महिन्यांत पामतेलाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत.
किंमती आणि उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी केंद्राने मे महिन्यापासून तेल उत्पादकांसोबत तीन बैठका घेतल्या आहेत.
भारत पामतेलाच्या आयातीसाठी इंडोनेशिया आणि मलेशिया, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलासाठी युक्रेन,
अर्जेंटिना, ब्राझील आणि रशियावर अवलंबून आहे.
Web Title :- Edible Oil Price | edible oil makers to cut retail prices by 10 to 12 per liter
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत फडणवीस यांचं महत्वाचं विधान; म्हणाले…
- Arvind Kejriwal | गुजरातमध्ये भाजप-काँग्रेसचे ‘ILU – ILU’, विलीन होणार; CM अरविंद केजरीवालांचा मोठा दावा
- Devendra Fadnavis | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात; देवेंद्र फडणवीस म्हणाले…