Devendra Fadnavis | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Devendra Fadnavis | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपाने (BJP) हालचाली सुरू केल्या असून महाराष्ट्रात विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे दिसते. यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर भाजपाचे विशेष लक्ष असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघाचा (Baramati Lok Sabha Constituency) दौरा करून येथील भाजपा कार्यकर्त्यांना बळ देणार आहेत. यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील वक्तव्य केले आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, भाजपाने गेल्या सहा महिन्यांपासून 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या 16 मतदारसंघात बारामती मतदारसंघही आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत आम्हाला तिथे चांगली मते मिळाली होती. या 16 मतदारसंघाला केंद्रीय भाजपाने प्रभारी म्हणून केंद्रीय नेते दिले आहेत. निर्मला सितारमन यांना बारामती मतदारसंघ दिला आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीला येतील. दरम्यान, भाजपा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघावर आगामी निवडणुकीसाठी लक्ष केंद्रित करणार असल्याने शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समोरील आव्हान वाढणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या बैठका सुरु आहेत. याबाबत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, आम्ही ज्या 16 मतदारसंघात भाजपा मजबूत करणार आहोत त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचाही मतदारसंघ आहे. पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना-भाजपा युती (Shivsena-BJP Alliance) म्हणून लढणार आहोत. आम्ही आमचा पक्ष मजबूत केला तरी शिवसेनेच्या सर्व खासदारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावणार आहोत.

 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पुणे जिल्ह्यातील दौर्‍याची माहिती देताना भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भगडे (Ganesha Bhagade) यांनी म्हटले की, 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान भाजपाच्या देशभरातील ‘प्रवास’ मोहिमेचा एक भाग म्हणून बारामती शहर आणि लोकसभा मतदारसंघांतर्गत इतर विधानसभा क्षेत्रांना सीतारामन भेट देतील. भाजपने 2024 च्या निवडणुकीपूर्वी 144 लोकसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातील 16 लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी दोन जागा पुणे जिल्हातील बारामती आणि शिरूर या आहेत. या मोहिमेसाठी भाजपाने केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेत्याला ‘प्रवास मंत्री’ म्हणून नियुक्त केले आहे.

 

असा आहे सीतारामन यांचा दौरा

डॉ. निर्मला सीतारामन 15 ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये येतील.
खडकवासला, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर तालुक्यांचा आढावा घेतील.
आरएसएसच्या तालुकानिहाय पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतील.
धायरी येथील एका मंगल कार्यालयात खडकवासला मतदारसंघाअंतर्गत बैठक घेतील.
सीतारामन यांच्यासोबतच आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह (Renuka Singh) याच काळात शिरूर लोकसभा मतदारसंघाला भेट देतील.

 

Web Title : – Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis on nirmala sitaraman baramati loksabha visit ncp sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा