Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत फडणवीस यांचं महत्वाचं विधान; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Devendra Fadnavis | एक महिना पूर्ण होऊन दुसरा महिना लागला तरी अद्याप राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच राज्याचा कारभार चालवत आहेत. यावरून विरोधी पक्ष सातत्याने दोघांवर टीका करत आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Extension) देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्टपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

मंत्रिमंडळाबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, मंत्रीमंडळ विस्तारावरून विरोधकांना असे बोलावेच लागेल. कारण त्यांचे मंत्रिमंडळ पाच जणांचेच होते. हेच पाच मंत्री 30 ते 32 दिवस सरकार चालवत होते. मात्र, आम्ही लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करणार आहोत.

 

राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने विरोधक सतत भाजपा (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत आहेत. या विलंबावरून टीका करताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले की, चांगले काम सुरू असतानाही आमचे सरकार पाडून महाराष्ट्राला अस्थिर करण्यात आले. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकट्याचेच मंत्रीमंडळ आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बिनखात्याचे मंत्री आहेत. अशा मंत्रीमंडळाचा राज्यासाठी काडीचाही उपयोग नाही.

 

पवार यांनी पुढे म्हटले की, इतरांनी तुमच्या दोघांकडे फक्त बघत बसायचे की, तुमच्या दिल्ली वार्‍या मोजायच्या.
मुख्यमंत्री नुसतीच दिल्लीवारी करत आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही, याचे कारण जनतेला सांगितली पाहिजे.
मंत्रीपदाची आस अनेक आमदारांना आहे. मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असावी.

 

Web Title : – Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis statement on shinde fadnavis govt cabinate expanssion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा