Edible Oil Price Update | सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल होणार स्वस्त; सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

नवी दिल्ली : Edible Oil Price Update | सर्वसामान्य जनतेला एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) रिफाइंड सोयाबीन (Refined Soybeans) आणि सूर्यफूल तेलावरील (Sunflower Oil) आयात शुल्क (Import Duty) कमी केले आहे. गुरूवारपासून आयात शुल्क कमी करण्यात आले आहेत. यामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात तेलाचा पुरवठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात (Edible Oil Price Update) घसरण होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत (Edible Oil Price Update) झालेली घसरण रोखण्याच्या सर्वतोपरी प्रयत्नात सरकार आहे. सरकारने आता रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी केले. अशा स्थितीत भविष्यात खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण होऊ शकते. दरम्यान, जागतिक बाजारातील (Global Market) खाद्य तेलाच्या किमती घसरल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने (शुक्रवार) खाद्यतेल संघटनांना प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर 8 ते 12 रुपयांनी तत्काळ प्रभावाने कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

कमोडिटी मार्केट तज्ज्ञ हेमंत गुप्ता (Hemant Gupta) यांनी सांगितले, की एकूण आयातीपैकी 75% आणि 25% कच्चे तेल व शुद्ध तेलाचा वाटा आहे. भारतातील वार्षिक वापर 24 दशलक्ष टन आहे.
खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी हे पाऊल निश्चितच उचलण्यात आल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आयात शुल्कात या कपातीमुळे आता रिफाइंड खाद्यतेलावरील आयात शुल्क 13.7% वर आली आहे,
ज्यात समाजकल्याणासाठी आकारण्यात येणारा उपकर (सेस) देखील समाविष्ट आहे. त्याच वेळी, सर्व प्रकारच्या कच्च्या खाद्यतेलावर प्रभावी आयात शुल्क 5.5% असेल.

सरकारने नुकतीच खाद्यतेल उत्पादकांसोबत बैठक घेतली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market)
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे दर कमी करण्यास सांगितले.
पण आता सरकारने आयातही स्वस्त केल्याने खाद्यतेलाच्या किमतीत लक्षणीय घट होऊ शकते.
साधारणपणे ‘क्रूड’ सोयाबीन आणि सूर्यफूल तेल भारतात आयात केले जाते, जे नंतर देशात शुद्ध केले जाते.
असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे.

Web Title :  Edible Oil Price Update | relief for common man edible oil to become more cheaper centre cuts import duty on refined soybean sunflower oils

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोडवर लवकर निलंबन कारवाई

CM Eknath Shinde | “साखर कारखान्यासाठी 25 किमीची अट शिथिल करण्यासाठी समिती नेमणार”

Maharashtra Weather Update | पुणे, मुंबईसह ‘या’ भागात पावसाचा इशारा: हवामाना खात्याचा अंदाज