Maharashtra Weather Update | पुणे, मुंबईसह ‘या’ भागात पावसाचा इशारा: हवामाना खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले, तर दुसरीकडे चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला आहे. या सगळ्यात मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत आहे. 23 जूनपासून राज्यात आणि देशात मान्सूनचा (Maharashtra Weather Update) रखडलेला प्रवास पुन्हा सुरू होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई (Mumbai), कोकणासह (Konkan) काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. वातावरणही ढगाळ असल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार (IMD), राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उन्हाच्या झळा देखील तापदायक ठरत आहेत. तर आज (शुक्रवार) मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर आज नंदूरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule) या शहरांमध्येही पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी स्पष्ट केले की, अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळपर्यंत दबाव निर्माण झाल्यामुळे ही स्थिती अरबी समुद्रात मान्सूनच्या शाखेला चालना देण्यास मदत करेल. 18 ते 22 जून दरम्यान पुणे आणि मुंबईत (Pune And Mumbai) मान्सून दाखल होऊ शकतो; मात्र राज्याच्या उत्तर भागात तसेच विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय हवामानाच्या माहितीनुसार (IMD), नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी 18 ते 21 जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
मात्र पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 16 ते 22 जूनच्या आठवड्यातही राज्यात पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये दिसत आहे.
मॉडेलनुसार 23 जूनपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे पाऊस तर कुठे हवामान कोरडे…

– मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद,
जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.

– सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,
वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल तर नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

Web Title :   Maharashtra Weather Update | maharashtra weather alert rain warning for mumbai pune and many districts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चोरट्यांनाही YAMAHA Rx 100 ची भुरळ ! पुण्यात चोरट्यांकडून 17 दुचाकी जप्त, तिघांना अटक

Ajit Pawar | अजित पवारांनी दिली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी; म्हणाले, “पाडापाडीचे राजकारण केला तर…”

Ranjitsinh Disale | बालभारतीच्या पुस्तकातून क्यूआर कोड वगळला; रणजितसिंह डिसले गुरुजी नाराज