रेल्वे पोलिसांना खुशखबर ! ड्युटीच्या वेळेत मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील अनेक वर्षापासून आठ तासांच्या ड्युटीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रेल्वे पोलिसांना आनंदाची बातमी आहे. १ ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांची ड्युटी आठ तासांची करण्यात येणार आहे. यापूर्वी पोलीस अधीक्षक मा.का. कर्वे यांच्या कार्यकाळात आठ तासांच्या तीन पाळ्यांचा प्रयोग करण्यात आला होता. काही काळ तो चालला मात्र, कर्वे यांच्यानंतर पदावर आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यात फारसा रस न दाखवल्याने रेल्वे पोलिसांच्या आठ तासांची ड्युटी बंद झाली.

लोकल महिला डब्यात गस्त, रेल्वे हद्दीत होणारे अपघात, चोरीचे गुन्हे नोंदवून तपास करणे आणि अति संवेदनशील ठिकाणी खडा पहारा यामुळे रेल्वे पोलिसांना सुमारे १२ ते १४ तास ड्युटी करावी लागते. व्हीआयपी बंदोबस्तामध्ये ड्युटीचा कालावधी १६ तासांपेक्षा जास्त असतो. याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रेल्वे पोलिसांनाही आठ तास ड्युटीचा नियम लागू करण्यात यावा, अशी मागणी रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत होती. अखेर ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी १ जानेवारी १०१८ रोजी मुंबई पोलिसांना आठ तासांची ड्युटी करण्याचा निर्णय घतेला होता. यानंतर रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी आठ तासांची ड्युटी करण्याची मागणी केली होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून येत्या १ ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांची ड्युटी आठ तासांची होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –