आठ वर्षाच्या मुलीचा पाय घसरून दुर्दैवी मृत्यू

वाई : पोलीसनामा ऑनलाईन – आईसोबत सुरत येथील मामाकडे भेटायला गेलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.७) रोजी घडली. रित्वी कुमारपाल ओसवाल (वय-८  रा. वाई) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. तिच्यावर मंगळवारी (दि.९) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Ritwi

सुरत येथील आपल्या चुलत मामाला भेटण्यासाठी रित्वी आईसोबत गेली होती. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घराच्या गॅलरीत खेळत असताना तिचा पाय खुर्चीवरून घसरून खाली पडली. यामध्ये गंभीर जखमी झलेल्या रित्वीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

Ritwi Oswal

रित्वी ओसवाल हिच्या मृत्यूची बातमी वाईमध्ये समजताच गावात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या अचानक जाण्याने ओसवाल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्यावर वाई येथील स्मशानभूमीमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजता अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

‘या’ खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी, जाणून घ्या

मनाची एकाग्रता वाढवायची आहे का ? करा ‘हे’ उपाय

हॉटेलमधील ‘फिंगर बाऊलमध्ये’ हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

Loading...
You might also like