Eknath Khadse | ‘बाळासाहेबांची वर्षानुवर्षांची पुण्याई गोठवली, हे अत्यंत…’, एकनाथ खडसे यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयोगाचा निर्णय अनाकलनीय असल्याचे शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Shivsena Leader Chandrakant Khaire) यांनी तर थेट निवडणूक आयोग मोदी सरकारच्या (Modi Government) ताब्यात आहे, असा आरोप केला आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. आता राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

 

एकनाथ खडसे यांनी म्हटले की, बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक… वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं. आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा.

 

खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले की, वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणे ही अत्यंत दु:खद आणि क्लेशदायक गोष्ट आहे.

मात्र, शिवसेनेचे चिन्ह गेल्यावर भाजपाने (BJP) शिवसेनेला खिजवले आहे.
भाजपा नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी ट्विट केले आहे की, मुख्यमंत्रीपदापायी मती गेली,
मतीविना हिंदुत्वनीती गेली, नीतीविना जनता गेली. जनतेसोबत सैनिक गेले, सैनिकानंतर चिन्ह व पक्षही गेला,
इतके अनर्थ मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने केले.

 

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse reaction over shivsena uddhav thackeray over election sign bow and arrow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘PM मोदी हे नोटबंदीनंतर घासलेलं नाणं’ उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Pune Crime | ‘जमतारा पॅटर्न’ ऑनलाईन फसवणूक प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर

Anil Desai | धनुष्यबाण गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय, बोलण्याची संधी…’