Anil Desai | धनुष्यबाण गोठवल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणूक आयोगाचा निर्णय अनाकलनीय, बोलण्याची संधी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anil Desai | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवल्यानंतर आणि नाव वापरण्यावर निर्बंध आणल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. राज्यभरातील शिवसैनिक (Shiv Sainik) आणि नेते यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपाला (BJP) जबाबदार ठरवत आपला संताप व्यक्त करत आहेत. आता शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी आयोगाच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे. हा निर्णय अनाकलनीय आहे. चिन्हाबाबत आयोगाने आधी बोलण्याची संधी द्यायला हवी, असे देसाई यांनी म्हटले आहे.

 

अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज होणार्‍या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत चिन्हाबाबतच्या पुढील लढाईची दिशा ठरवली जाईल. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी (Thackeray Group) धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते. दरम्यान, शिवसेनेने बोगस शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. हा आरोप खोटा असल्याचे देसाई म्हणाले.

 

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई केली आहे.
त्यामुळे दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे.
10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

 

Web Title :- Anil Desai | election commission freezes uddhav thackeray shivsena dhanushyaban symbol anil desai reacted on decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | ‘सत्तेच्या अडीच वर्षात काहीच केले नाही म्हणून…’, मंत्री दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

NCP Chief Sharad Pawar | ‘शरद पवार म्हणजे राज्याच्या राजकारणातील ‘बर्म्युडा ट्रँगल’, विजय शिवतारेंचा घणाघात

Chandrakant Khaire | मोदींच्या हातात सर्व यंत्रणा, देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचलाय, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप!