Eknath Khadse | ‘…म्हणून मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर’ एकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

0
467
Eknath Khadse | ncp leader eknath khadse criticized shinde government says cabinet expansion delayed to avoid discontent criticized
file photo

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येऊन सात महिने होत आले तरी अद्याप 18 मंत्र्यावर राज्याचा कारभार सुरु आहे. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने सर्व अनागोंदीची परिस्थिती आहे. मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) शिंद गट आणि भाजपमधील (BJP) अनेकजण इच्छुक आहेत. या सर्वांना मंत्री मंडळात सामावून घेणे अशक्य असल्याने आणि असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवणीवर टाकला जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. कल्याणमधील लेवा पटीदार समाजाच्या एका कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

राज्यात सध्या अराजक सदृश्य परिस्थिती आहे. कायदा सुव्यवस्था (Law and Order) राहिलेली नाही. बेरोजगारी, महागाई वाढली आहे. उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत. राज्यावर सहा लाख 66 हजार कोटींचे कर्ज आहे. यामधील सर्वात मोठे कर्ज गेल्या सात महिन्यात घेतले आहे. विकास कामांच्या (Development Work) नावाखाली हे कर्ज घेतले असले तरी राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले.

शिंदे सरकार अस्थिर आहे
राज्यातील एका सी सर्वेक्षणामध्ये (C Survey) 2024 मध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.
हा दावा सत्य परिस्थितीवर अवलंबून असून यामध्ये काहीही चूक नाही. सध्याची परिस्थिती त्या सर्वेक्षणातून दिसून येते.
राज्यातील शिंदे सरकार अस्थिर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालावर या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याचे, एकनाथ खडसे यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीमध्ये सामान्यांची होरपळ होत आहे. त्याचा राग ते मतदान पेटीतून व्यक्त करतील, असेही खडसे म्हणाले.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse criticized shinde government says cabinet expansion delayed to avoid discontent criticized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय?

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR