Eknath Khadse | खडसेंवरील ‘झोटिंग समिती’चा अहवाल विधिमंडळात सादर करण्याची गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अडचणीत आणण्यासाठी महाराष्ट्र भाजपाने (Maharashtra BJP) व्यूहरचना आखल्याचे दिसत आहे. एकीकडे भोसरी भूखंड घोटाळ्याचे प्रकरण (Bhosari Plot Scam Case) बंद होण्याच्या मार्गावर असताना तक्रारदाराने तपासावरच आक्षेप घेत पुन्हा चौकशीची मागणी केल्याने कोर्टाने या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खडसे (Eknath Khadse) अडचणीत आले आहेत. तर दुसरीकडे खडसे यांचे कट्टर विरोधक आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे जवळचे सहकारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल (Zoting Committee Report) विधीमंडळात सादर करण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

 

या प्रकरणात मला अडकवण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप दोनच दिवसांपूर्वी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. यानंतर आता गिरीश महाजन यांनी ही मागणी केली आहे. महाजन यांनी म्हटले की, या प्रकरणात दूध का दूध, पाणी का पाणी झालेच पाहिजे. झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर यायला हवा. त्यात खडसेंना क्लीन चीट दिली आहे किंवा नाही हे समोर येईल. खडसे जर शुद्ध असतील तर सर्व गोष्टी बाहेर यायला हव्यात.

 

भोसरी प्रकरणातील तक्रारदारावरही एकनाथ खडसे यांनी आरोप केले आहेत.
कारण याच तक्राराने चौकशीवर आक्षेप घेत नव्याने चौकशीची (Inquiry) मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली आहे.
खडसे यांनी याप्रकरणामागे भाजपा असल्याचे म्हटल्यावर खडसे-महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारवर गंभीर ताशेरे ओढल्याची माहितीही एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
खडसे म्हणाले होते की, या प्रकरणात सरकार हे विरोधी पक्षाचे समर्थन करीत असल्याचे हे अनोखे उदाहरण आहे,
सत्तेच्या तालावर तपास यंत्रणा नाचत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

 

Web Title :- Eknath Khadse | present the report of the zoting committee on eknath khadse bhosari land to the legislature girish mahajans demand to the chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WhatsApp Down | व्हॉट्सॲप कधी सुरु होणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण

Dada Bhuse | बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोराला मंत्री दादा भुसेंनी पकडले, नंतर पोलिसांच्या केले स्वाधीन

CM Eknath Shinde | राज ठाकरेंसोबत युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले-‘आम्ही फक्त…’