CM Eknath Shinde | राज ठाकरेंसोबत युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले-‘आम्ही फक्त…’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – मनसेतर्फे आयोजित शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दीपोत्सव (MNS Deepotsav) कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजप (BJP) शिंदे युती होणार का, या चर्चा रंगल्या होत्या. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आम्हाला दीपोत्सव कार्यक्रमाला बोलावले होते. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही फक्त सणांवर बोललो होतो, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वी मनसेच्या डोंबिवलीतील कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी आकस्मित भेट दिल्याने मनसे शिंदे भाजप युतीच्या (MNS-Shinde-BJP Alliance) चर्चांना उधान आले होते. त्यावर मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी प्रतिक्रिया देताना सूचक विधान केले होते. आमची मने केव्हाच जुळली आहेत. त्यामुळे आता फक्त वरुन तारा जुळायच्या बाकी आहेत, असे राजू पाटील म्हणाले होते.

 

भाजप, शिंदे आणि राज ठाकरेंचा शत्रू एकच आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray). तिघांना देखील शिवसेनेला मुंबई महापालिकेतून (BMC) खाली खेचायचे आहे.
त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत ते एकत्र लढणार का, असा सर्वांना प्रश्न आहे.
तसेच महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडल्यापासून आणि शिंदे यांचा शपथविधी झाल्यापासून राज ठाकरे,
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मैत्री वाढली आहे. त्याचमुळे त्यांच्या या सततच्या भेटी चर्चांचा विषय ठरत आहेत.

 

Web Title :- CM Eknath Shinde |cm eknath shinde comments on mns bjp and eknath shinde group alliance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dada Bhuse | बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोराला मंत्री दादा भुसेंनी पकडले, नंतर पोलिसांच्या केले स्वाधीन

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

WhatsApp Down | तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सॲप डाऊन, ग्रुप्सवर मेसेजिंग थांबलं!