Eknath Pawar Join Shivsena UBT Group | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार, नितीन गडकरी यांचा खंदा समर्थक बांधणार ठाकरेंचे शिवबंधन

पिंपरी चिंचवड : Eknath Pawar Join Shivsena UBT Group | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडल्याने अनेक ठिकाणची राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पारडे शिंदे गटाच्या तुलनेत जड असल्याचे दिसत आहे. त्यानुसार राजकीय नेते आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पावले टाकू लागले आहेत. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. (Eknath Pawar Join Shivsena UBT Group)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे खंदे समर्थक एकनाथ पवार हे लवकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. २५ तारखेला एकनाथ पवार मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. (Eknath Pawar Join Shivsena UBT Group)

एकनाथ पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भोसरी विधानसभेचे (Bhosari Vidhan Sabha) तिकीट दिले जाईल,
अशी शक्यता व्यक्त केली जातेय. भाजपमध्ये त्यांना फारसे बळ मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

याबाबत एकनाथ पवार यांनी म्हटले की, मी नवरात्रीमध्ये माझी भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे.
तसेच येत्या काही दिवसात तसे चित्र देखील पहायला मिळेल.

एकनाथ पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे समर्थक आहेत. २०१४ ला पवार भोसरी विधानसभा निवडणुकीत ५२ हजार
मते पडली होती. महापालिकेत सभागृह नेते पदाची जबाबदारी पार पाडली आहे.
भाजपाचे एकनिष्ठ नेते म्हणून ते ओळखले जातात. पवार शिवसेनेत गेल्यास भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूड पडल्यानंतर पिंपरी चिंचवड शरद पवार यांच्या यांच्या राष्ट्रवादीत सुद्धा इनकमिंग
सुरू झाले आहे. तर काही जण सोबत येण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत वेगळे चित्र पहायला
मिळू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Inspector Promotion ACP / DySP | राज्यातील 104 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक पदी बढती