Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी (Shivsena Rebels MLA) आणि त्यांनतर भाजपच्या (BJP) साथीने घडवलेल्या सत्तांतर नाट्याच्या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप तर अजूनही सुरूच आहेत. त्यातच आता न्यायालयीन लढाई सुरू होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या भेटीचा एक फोटो व्हायरल (Photo Viral) होत असल्याने आश्चर्य व्यक्त होते, मात्र शिंदे यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल भेट घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. तसेच या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून राजकीय चर्चेला उधाण आले असताना स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही बातमी चुकीची असून, त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही, असे म्हटले आहे.

 

 

याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून, त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नाही. याबाबतच्या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये.

 

 

एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीच्या वृत्ताने आणि फोटोमुळे राजकीय वर्तुळासह शिंदेच्या गटातही चलबिचल सुरू झाली होती.
परंतु अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 

 

काही दिवसांपूर्वीच, शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असे भाकित शरद पवारांनी वर्तवले होते.
तसेच आमदारांना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्यास सांगितले होते.

 

Web Title :- Eknath Shinde | CM eknath shinde sharad pawars visit photo goes viral discussion in media finally the explanation given by the chief minister said the photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

 

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

 

Pune News | GPA तर्फे ‘डाॅक्टर्स डे’ उत्साहात साजरा ! डाॅ.विजय पाटील यांना ‘जी पी डाॅक्टर ऑफ ईयर’ पुरस्कार प्रदान