Eknath Shinde | अबब…शिंदे गटाच्या गुवाहाटीतील 8 दिवसाच्या फक्त जेवणाचं बिल तब्बल इतके लाख, एकूण खर्च किती?

Eknath Shinde | eknath shinde rebel mlas paid 70 lakh for 8 day stay at guwahati hotel report dinner and lunch bill
FILE PHOTO

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषदेच्या निकालानंतर व्हाया सुरत गुवाहाटी येथे मुक्कामी गेलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी रेडिसन ब्लू (Radisson Blu Guwahati) या हॉटेलचे संपूर्ण बिल (Bill) दिल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेशी (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आठ दिवस होते. बुधवारी चेक आऊट करताना या हॉटेलचं बिल दिल्याचे प्रसार माध्यमांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. मात्र आठ दिवसांचे बिल नेमकं किती आले याचा आकडा हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आला नसला तरी ही रक्कम 68 ते 70 लाखांच्या घरात जाते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हाताशी धरत त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष अशा जवळपास 50 जणांचा पाठिंबा आहे. हे सर्व आमदार सध्या गोव्यातील हॉटेलमध्ये आहे. बहुमत चाचणीला (Majority Test) हे सर्व आमदार मुंबईत परतणार आहेत. पण या आमदारांच्या गुवाहाटीमधील खर्च तब्बल 70 लाखांच्या आसपास आहे. फक्त जेवणाचं बिल (Meal Bill) 22 लाख रुपये असल्याचे वृत्त आहे.

 

प्रसार माध्यमांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रॅडिसन ब्ल्यूचं आठ दिवसाचे बिल एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी भरलेय.
त्यांचा एकूण खर्च हॉटेल व्यवस्थापनानं सांगितला नाही. पण सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी 68 ते 70 लाख रुपयांची रक्कम भाडे म्हणून हॉटेलला चुकती केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हॉटेलमध्ये 70 खोल्या बूक करण्यात आल्या होत्या.
बंडखोर आमदारांमुळे हॉटेल व्यवस्थापनाने 22 ते 29 जून दरम्यान अन्य ग्राहकांसाठी रेस्रॉ, बँक्वेट आणि इतर सुविधा बंद केल्या होत्या.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा हॉटेलमधील मुक्काम सुपीरियर आणि डिलक्स रूम मध्ये होता.
हॉटेलच्या वेबसाईटनुसार, एक खोलीचं भाडे 7500 ते  8500 रुपये प्रति दिवस इतके होते.
सवलत आणि टॅक्स धरुन 70 खोल्यांचं भाडं जवळपास 68 लाख रुपयांच्या घरात जातं.
त्याशिवाय 8 दिवसांतील जेवणाचा खर्च तब्बल 22 लाख रुपये इतका आल्याचे वृत्त आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | eknath shinde rebel mlas paid 70 lakh for 8 day stay at guwahati hotel report dinner and lunch bill

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

RTI मध्ये झाला खुलासा ! अटल पेन्शन योजनेत सर्वात जास्त प्रीमियम देणारे राज्य बनले यूपी, महाराष्ट्र आणि बंगाल मागे नाही

 

Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)

Total
0
Shares
Related Posts