Eknath Shinde Group | एकनाथ शिंदेचे ‘दे धक्का’ सुरूच! दीपक केसरकरांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील तीन नेते शिंदें गटात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) यांनी शिवसेनेला मोठे भगदाड पाडले. त्यानंतरही ते सातत्याने शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळची माणसे फोडून आपल्या गटात (Eknath Shinde Group) त्यांचा समावेश करत आहेत. शिंदे यांचे शिवसेनेत फोडाफोडी करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Spokesperson Deepak Kesarkar) यांनी सिंधुदुर्गातील तीन नेते आपल्या गळाला लावले आहेत. शिवसेनेचे येथील तीन नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत.

 

शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी आज उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उप जिल्हाप्रमुखांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश केला आहे.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उप जिल्हाप्रमुखांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम शिंदे गट करत असल्याने पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटल्याचे, एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे.

दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्गातील सचिन देसाई (Sachin Desai),
सुनील डुबळे (Sunil Duble) आणि बाळा दळवी (Bala Dalvi) यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेशावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,
खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) उपस्थित होते.

 

Web Title :- Eknath Shinde Group | big blow to uddhav thackeray from
deepak kesarkar in sindhudurg three leaders with shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा