Narayan Rane | याआधी धनुष्यबाण उजेड पाडू शकला नाही, मग मशाल…, नारायण राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | क्रांती घडवायची होती तर तुम्ही मुख्यमंत्री असताना क्रांती का घडवली नाही. लोकांच्या घराला मशाल लावली. नावात उद्धव (Uddhav Thackeray) आहे. पण उद्ध्वस्त करायला मशाल लावू नये, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह दिले आहे.

 

मशाल चिन्ह (Mashal Symbol) मिळाल्यानंतर नवीन चिन्ह क्रांती घडवेल असा दावा शिवसेनेने (Shivsena) केला आहे. यावर नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, तुम्हाला जर क्रांती घडवायची होती तर सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री असताना क्रांती का घडवली नाही. लोकांचे घर उद्ध्वस्त करायला मशाल लावली. तुमच्या नावात उद्धव आहे, पण उद्ध्वस्त करायला मशाल लावू नये. आता राज्यात एवढा उजेड पडला आहे की मशालीची गरजच पडणार नाही. याआधीही धनुष्यबाण काही उजेड पाडू शकला नाही, मग मशाल काय उजेड पाडणार.

राणे म्हणाले, मशाल काळोखातून रस्ता काढायला लागते. मग यांना काय दिसत नाही काय?
एवढा उजेड आहे तर कशाला मशालची गरज आहे.
लोकांना घर, अन्नधान्य आणि पोटाचा प्रश्न हे खरे प्रश्न आहेत.

 

Web Title :- Narayan Rane | when uddhav was chief minister he lit a
mashal on people houses and destroyed them says narayan rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा