एकता कपूर ‘ऑफ शोल्डर’ गाऊनमुळं चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर नेहमीच तिच्या मालिकांमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती तिच्या कपड्यांच्या वेगळेपणामुळे चर्चेचा विषय ठरली. नुकत्याच झी फाइव्हच्या एका कार्यक्रमात एकता कपूरने ऑफ शोल्डर गाऊनमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ नावाच्या या वेबसिरीजच्या लॉंच पार्टीमध्ये ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. एकता कपूर एरवी ड्रेस, स्कर्ट, गाऊन्स घालून विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. मात्र यावेळी तिने केलेल्या या वेगळ्या आऊटफिटमुळे तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ नावाच्या या वेबसिरीजमध्ये राजीव खंडेलवाल आणि दिव्यांका त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दिव्यांका त्रिपाठीने यापूर्वीही ‘ये है मोहबत्ते’ या मालिकेत एकता कपूरसोबत काम केले होते.

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. छोट्या पडद्यावरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या तिच्या मालिकाही खूप गाजलेल्या आहेत. आता तिने वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like