एकता कपूरने उडवली होती सलमान खानची ‘टर’, ‘असा’ घेतला होता सलमानने ‘बदला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीची क्वीन मानल्या जाणाऱ्या एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, एकताचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत भांडण झाले आहे. या यादीत बॉलिवूडचा दबंग सलमान खानचंही नाव आहे. सलमानच्या दुश्मनांच्या यादीत टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन एकता कपूरचेही नाव समाविष्ट आहे ज्याने चांगलाच बदला घेतला होता. कारण एकताने सलमानची टर उडवली होती. सलमानचा हम आपके है कौन हा सिनेमा आला होता तेव्हा त्या सिनेमाची टर उडवताना एकता म्हणाली होती, हम आपके है पॉर्न, आणि किक सिनेमाला लिक असे म्हटले होते.

अशी माहिती समोर आली आहे की, सलमानला एकताचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते. तो तिच्यावर नाराजही होता. कोणताही विचार न करता एकताने सलमानशी पंगा घेतला होता. तिला हे माहीत होते की, कधीना कधी तिला त्याची गरज पडणार आहे. त्यानंतर सुल्तान या सिनेमावेळी फ्लाईंग जट या सिनेमाचा टीजर सुल्तान सोबत दाखवला जावा अशी एकताची मागणी होती परंतु सुल्तानच्या टीमने ही ऑफर रिजेक्ट केली.

तुम्हाला सांगू इच्छितो की, यामुळे सलमान खानचे मोठे नुकसान झाले होते. अशापक्रारे सलमान खानने आपला बदला घेतला होता. त्यानंतर असेही म्हटले जात आहे की, सलमान आणि एकता एकमेकांसोबत जास्त बोलत नाहीत.