गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींसाठी आज न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

न्यायालयात खटला चालत असलेल्या किंवा कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या राजकीय नेत्यांसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत अशा नेत्यांना निवडणुका लढविण्याचा हक्क आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालय या महत्वपूर्ण याचिकेवर आज निकाल सुनावण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce18c4a2-c07b-11e8-a70a-db72ce831a4c’]

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने यावर २८ ऑगस्टला निर्णय राखून ठेवला होता. आज यावर निर्णय होऊ शकतो. याप्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल म्हणाले होते, कायदा बनवणे हे संसदेच्या अधिकारक्षेत्रात येते. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये. यापूर्वी न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते, की  मतदारांना त्यांचा उमेदवार आणि त्यांची पाश्र्वभूमी  जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे.

[amazon_link asins=’B00QESWIV6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e4664cea-c07b-11e8-b82f-d3655f9a7745′]

तज्ज्ञांच्या मते याप्रकरणी न्यायालय निवडणूक आयोगामार्फत राजकीय पक्षांना खटला सुरू असणाऱ्या किंवा विविध गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींना निवडणूक न लढवू देण्याचे निर्देश देऊ शकते. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत फौजदारी खटला चालत असलेले आमदार किंवा खासदार जर दोषी आढळले तर त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात येऊ शकते का ? ते निवडणूक लढवण्यास पात्र असणार की अपात्र ? असा महत्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आज न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.

प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन