Electric Bike | अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटरपर्यंत धावते ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, किंमत 50 हजार; जाणून घ्या

नवी दिल्ली : Electric Bike | हैद्राबाद येथील स्टार्टअप कंपनी Atumobile प्रायव्हेट लिमिटेडच्या या इलेक्ट्रिक बाईकचे नाव Atum 1.0 आहे. ती 2020 मध्ये लाँच झाली होती. तिची प्रारंभिक किंमत 49,999 रुपये असून कंपनीच्या वेबसाइटवर ती बुक करू शकता. संपूर्ण भारतात बाईकची (Electric Bike) डिलिव्हरी मिळते.

मात्र दिल्लीत ही बाईक खरेदी केल्यास 54,442 रुपये भरावे लागतात. ऑन रोड किंमतीत आरटीओ फी 2,999 रुपये आणि इन्श्युरन्स फी 1,424 रुपये आहे. विविध राज्यात तिची किंमत वेगळी असू शकते.

कंपनीनुसार ही एक दमदार इलेक्ट्रिक बाईक आहे. जी या सेगमेंटमध्ये सर्वात परवाडणारी आहे. बाईकमध्ये कंपनीने 47V, 27Ah ची पोर्टेबल लिथियम आयर्न बॅटरी दिली आहे. जिच्यासोबत 250 वॉटची इलेक्ट्रिक मोटर आहे.

बाईक फुल चार्जसाठी 3 ते 4 तास लागतात. कंपनीनुसार बाईक एकदा फुल चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये 35 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड मिळतो.

कंपनीनुसार बाईकचा टॉप स्पीड यासाठी 35 किलोमीटर प्रति तास ठेवला आहे जेणेकरून बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासू नये.

बाईकच्या बॅटरीवर 2 वर्षाची वॉरंटी आहे. बॅटरीचे एकुण वजन 6 किलोग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की,
बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी अवघ्या 1 युनिट विजेचा खर्च येतो. यानुसार एकवेळ चार्ज करण्यासाठी अवघा 7
रुपये खर्च येईल ज्यामध्ये ती 100 किलोमीटरची रेंज देईल.

हे देखील वाचा

Railway Ticket Refund Rules | ट्रेनचे तिकीट कॅन्सल केले तर कापले जातात ‘एवढे’ चार्जेस, जाणून घ्या रेल्वेचे कॅन्सलेशन नियम

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार का?, वडेट्टीवार म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Electric Bike atum 1 0 runs 100 km in single charge know complete details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update