Electric Scooter Battery Blast In Mumbai | धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Electric Scooter Battery Blast In Mumbai | मुंबईमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वसई पूर्व भागातील रामदास नगर या ठिकाणी रातील इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज (Battery Charge) करत असताना अचानक स्फोट (Electric Scooter Battery Blast In Mumbai) झाला, त्यामुळे घराला आग लागली. या आगीमध्ये शब्बीर अन्सारी (Shabbir Ansari) हा चिमुरडा पूर्णपणे भाजला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी (Vasai Manikpur Police) एडीआर अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

 

काय घडले नेमके?
घटनेच्या वेळी शब्बीरचे वडील शरफराज बेडरूममध्ये झोपले होते. तर शब्बीर आणि त्याची आजी हॉलमध्ये झोपली होती. यादरम्यान चॅर्जींग लावलेल्या बॅटरीने अचानक पेट घेतला आणि घराला आग लागली. दरम्यान शब्बीर त्या आगीत भाजला गेला. यानंतर शरफराज यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णाल्यात नेले परंतु त्याने त्याअगोदरच आपला जीव सोडला होता. चार्जींग सुरु असताना बॅटरीचा स्फोट कशामुळे झाला याचा वसई माणिकपूर पोलिस शोध घेत आहेत.

घटनेच्या दिवशी पहाटे 2 वाजून 30 मिनीटांनी शरफराज यांनी आपल्या इलेक्ट्रीक वाहनातील बॅटरी काढून चॅर्जींग लावले होते.
ही बॅटरी चार्ज होण्यासाठी कमीतकमी 3 ते 4 तास लागतात.
याचा अंदाज घेत शरफराज यांनी बॅटरी आपल्या घरातील हॉलमध्ये लावली होती.
त्यामुळेच बॅटरी चार्जला लावून ते झोपायला गेले. त्यानंतर अचानक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास शरफराज यांना मोठा आवाज ऐकू आला.
यानंतर त्यांना हॉलला आग लागल्याचे दिसले तसेच छताच्या पंख्याला आग लागली होती.
यानंतर ते आपल्या आईला आणि मुलाला घेऊन घराबाहेर पडले.

 

Web Title :- Electric Scooter Battery Blast In Mumbai | battery blast mumbai seven year old boy died in an electric bike battery explosion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगावरील उपचारांसाठी भारतातील उत्कृष्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर शनिकृपा हार्टकेअर सेंटर