वीजबिल भरणा केंद्र सुट्टीदिवशी सुरु राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. २८ व २९ जुलैला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत.
[amazon_link asins=’B005LTPPBO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2eb7c9a-9190-11e8-8879-a961321384c3′]

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई पुणे परिमंडलात सुरु आहे. त्यामुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

याशिवाय चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा अंतीम मुदतीपूर्वी व मागील महिन्यांतील थकबाकीच्या रकमेचा तात्काळ भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.