Homeताज्या बातम्याअडचणीच्या काळात उपयोगी पडतो Emergency Fund, जाणून घ्या किती आणि कसा तयार...

अडचणीच्या काळात उपयोगी पडतो Emergency Fund, जाणून घ्या किती आणि कसा तयार करावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Emergency Fund | अचानक आलेल्या समस्येत पैशांची व्यवस्था करणे खुप अवघड असते. यासाठी ज्याप्रकारे तुम्ही भविष्यासाठी फायनान्शियल प्लानिंग (Financial Planning) करता, त्याचप्रमाणे इमर्जन्सी फंड (emergency fund) सुद्ध बनवला पाहिजे. आता प्रश्न हा आहे की, इमर्जन्सी फंड किती असावा आणि तो कसा तयार करावा.

 

किती महत्वाचा आहे हा फंड

यासाठी मार्केट एक्सपर्ट म्हणतात की, तुम्ही सामान्य दिवसात ज्याप्रकारे आपल्या कमाईचा काही भाग काढून भविष्याच्या योजनांमध्ये गुंतवता, त्याच प्रकारे काही भाग इमर्जन्सी (emergency) साठी सुद्धा जमा करून ठेवला पाहिजे.

 

6 महिन्यांचा फंड

इमर्जन्सी फंड तयार करताना लक्षात ठेवा की हा फंड एखाद्या अन्य गरजेसाठी वापरू नये. तज्ज्ञ म्हणतात की, कोणतेही संकट 6 महिन्यांपेक्षा जास्त नसेत. एकतर इतक्या दिवसात वाईट काळ निघून जातो किंवा मनुष्य यातून उभे राहण्यासाठी मार्ग शोधतो.

 

इमर्जन्सी फंड किती असावा

Emergency Fund मासिक वेतनाच्या किमान 6 पट असावा. तुम्हाला तुमच्या सहा महिन्याची कमाई इमर्जन्सी फंडसाठी वाचवून ठेवली पाहिजे. जर तुम्ही 50 हजार रुपये महिना कमावत असाल तर तुमच्याकडे किमान 3 लाख रुपयांचा इमर्जन्सी फंड असावा. हा फंड तुमची बचत आणि गुंतवणुकीपासून वेगळा असला पाहिजे.

 

जमा करा इमर्जन्सी फंड

इमर्जन्सी फंड एक अशा ऑपशनमध्ये गुंतवला पाहिजे, जिथून तुम्ही सहजपणे काढू शकता. इमर्जन्सी फंड रोकडच्या रूपात किंवा सेव्हिंग बँक (Saving Bank) अकाऊंटच्या रूपात असू शकतो.

यात गुंतवा इमर्जन्सी फंड

इमर्जन्सी फंड तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंड (Liquid MF) मध्ये सुद्धा ठेवू शकता.
Liquid Mutual Funds मध्ये केवळ मनी मार्केट सिक्युरिटजमध्ये गुंतवणूक केली जाते.
यामुळे यात जोखीम कमी असते. फिक्स डिपॉजिट (FD) या रेकरिंग डिपाझिट (RD) मध्ये सुद्धा तुम्ही इमर्जन्सी फंड (emergency fund) बनवू शकता.

 

फंड तीन भागात विभागा

तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड तीन भागात विभागून ठेवू शकता.
तो अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्ममध्ये विभागलेला असू शकतो.
डेट फंडमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता.
फिक्स डिपॉझिट (FD) किंवा रिकरिंग डिपॉझिट (RD) सारख्या योजनांमध्ये सुद्धा तुम्ही इमर्जन्सी फंड (emergency fund) जमा करू शकता.

 

इमर्जन्सी फंडमध्ये वाढ

इमर्जन्सी फंडसाठी (Emergency Fund) केवळ एकदा पैसे जमा करून ठेवणे पुरेशे नाही.
कारण महागाई सतत वाढत आहे. यासाठी तुम्ही जो इमर्जन्सी फंड तयार केला आहे त्यामध्ये काळानुसार वाढ करत राहा.

 

Web Title :- Emergency Fund | emergency fund news investment and money making tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Numerology | ‘या’ मूलांकाच्या मुली बनतात चांगली पत्नी, बदलू शकते पतीचे ‘नशीब’; जाणून घ्या

Pune Crime | …म्हणून पुण्यातील एका विवाहितेने खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या तब्बल 50 गोळ्या

Priyanka Chaturvedi | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा ! उपराष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली खंत; सांसद टीव्हीचे अँकरपद सोडले

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News