पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो-एअरच्या विमानात आज सायंकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने औरंगाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानामध्ये १६५ प्रवासी प्रवास करत असून घटनास्थळी आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

पटणा-मुंबई विमान पटण्याहून मुंबईला जात होते. सायंकाळी या विमानात बिघाड झाल्यामुळे औरंगाबाद येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंग करण्यात आले असल्याचे विमानतळ प्राधिकरण सुत्रांनी सांगितले. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानतळावर रुग्णवाहिकांचा ताफा दाखल झाला.

रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर पोलिसांचा ताफा दाखल झाला. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते. ब-याच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानाची तांत्रिक तपासणी करून ते रवाना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Loading...
You might also like