खुशखबर ! आता थेट ‘ऑनलाइन’ काढा PF मधून ‘आगाऊ’ रक्कम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरदारांसाठी अतंत्य महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता नोकरदारांना पीएफ खात्यातून ऑनलाइन पद्धतीने अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा कार्यालयाने उपलब्ध करुन दिली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची वेळ येणार आहे. हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर सध्या पुणे आणि आकुर्डी कार्यालयात राबवण्यात येणार आहे.

केवायसी आवश्यक –
पीएफच्या पुणे आणि आकुर्डीच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोकरदारांना आगाऊ रक्कम काढण्यासाठी आधार क्रमांक, पॅन कार्ड आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे, कारण हे क्रमांक पीएफच्या खात्याला जोडणे आवश्यक आहे. तसेच खातेधारकांना केवायसी पूर्ण केल्यानंतर पीएफमधून अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करता येईल.

मुलांचे शिक्षण, घर खरेदी, घर दुरुस्ती, लग्न या आणि इतर अनेक कारणांसाठी अनेकांना पैशाची आवश्यकता जाणवते. हीच गरज ओळखून पीएफ खात्यात जमा रक्कमेतून आगाऊ रक्कम काढण्याची ऑनलाइन सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या आधी प्रक्रिया अत्यंत अवघड होती, त्यासाठी विविध कागद पत्र अर्जाला जोडावे लागत होते. ती कागद पत्रे घेऊन पीएफ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. यानंतर अर्जाची पडताळणी झाल्यावर अॅडवान्स क्लेम मान्य करण्यात येत असे.

या सर्व प्रक्रियेनंतर खातेधारकांचा खात्यात आगाऊ रक्कम जमा करण्यात येते. परंतू यासाठी खातेधारकांना अनेकदा पीएफ कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत, हे सर्व टाळण्यासाठी अखेर ऑनलाइन क्लेम स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे आहे अ‍ॅप –
यापुढे घरबसल्या ‘उमंग’ अ‍ॅपचा वापर करुन खातेधारक ऑनलाइन अ‍ॅडवान्स रक्कम काढण्यासाठी अर्ज करु शकतो. या अर्जनंतर अगदी आठवड्याभरात खात्यात रक्कम जमा करण्यात येईल अशी महिती पुण्याचा पीेएफ कार्यालयातून देण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –