Employees Provident Fund | EPFO सदस्यांसाठी खुशखबर ! पीएफ खात्यात येतील 40,000 रुपये, जाणून घ्या डिटेल्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रॉव्हिडंट फंड (Employees Provident Fund) हा पगारदार कर्मचार्यांसाठी बचत निधी आहे. सरकारी कर्मचारी असो वा खाजगी कर्मचारी, प्रत्येकजण भविष्य निर्वाह निधीकडे भविष्याची बचत म्हणून पाहतो. दरम्यान, केंद्र सरकारने EPFO सदस्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. लवकरच व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. (Employees Provident Fund )
याचा फायदा देशातील 6 कोटींहून अधिक लोकांना होणार आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओचा व्याजदर 8.1 टक्के आहे. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी दर आहे. तुमच्या खात्यात 40 हजार रुपये कसे येणार ते जाणून घेऊया.
कधीपर्यंत येणार व्याजाचे पैसे
जर तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये असतील तर तुम्हाला सुमारे 40,000 रुपये व्याज म्हणून मिळतील. ईपीएफओने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी, मीडिया रिपोर्टनुसार या महिन्यात 30 जूनपर्यंत खात्यात व्याज जमा होईल.
—
पीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची
घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून पीएफ खात्यात किती पैसे आहेत हे तुम्ही जाणून घेऊ शकता. तुम्हाला ईपीएफओ नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO UAN LAN मेसेज पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे. अशा प्रकारे हिंदीमध्ये HIN आणि तमिळमध्ये TIM लिहिले जाते. (Employees Provident Fund )
उमंग अॅपवरून जाणून घ्या पीएफ बॅलन्स
1. प्ले स्टोअरवरून तुमच्या स्मार्टफोनमध्ये उमंग अॅप डाउनलोड करा.
2. फोन नंबर नोंदवून अॅपमध्ये लॉग इन करा.
3. वरच्या डाव्या कोपर्यातील मेनूमधील सर्व्हिस टॅबवर जा.
4. येथे ईपीएफओ पर्यायावर क्लिक करा. व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, ओटीपी आणि यूएएन नंबरद्वारे शिल्लक तपासा.
Web Title :- Employees Provident Fund | good news for epfo members rs 40000 will come in pf account know details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update