ICC World Cup 2019 : ‘ENG Vs NZ’च्या सामन्या दरम्यान मैदानात उतरला ‘नग्न’ माणूस, पुढं झालं असं काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड आणि न्युझीलँडच्या चेस्टर ली स्ट्रीट येथे झालेल्या सामन्यात एक असे दृश्य पाहिला मिळाले ज्यामुळे सामना पाहण्यासाठी आलेले दर्शक भलतेच आश्चर्यचकीत झाले.

मॅच दरम्यान न्यूजीलॅड बॅटींग करत असताना ३४ व्या ओवरला एक नग्न व्यक्ती सुरक्षेचा घेरा मोडत थेट मैदानात शिरला आणि त्याने मॅच सुरु असलेल्या मैदानात डांस करण्यास सुरुवात केली. न्युझीलँडच्या बॅटींग दरम्यान हा नग्न व्यक्ती मैदानात शिरला आणि विविध करामती करु लागला, एवढेच नाही तर तो भर मैदानात पळत सुटला.

हे दृश्य पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले. या घटनेमुळे ५ मिनिटांसाठी सामना थांबविण्यात आला होता. या नग्न व्यक्तीने मैदानात धावण्यास सुरुवात केली आणि जेव्हा सुरक्षा रक्षक मैदानात त्याला आडवण्यासाठी आले तेव्हा या व्यक्तीने त्यांना बरेच थकवले.

यावेळी बॅटीग करण्यासाठी मैदानात उतरलेले टॉम लाथम आणि मिचेल सेंटनर हे इंग्लंडचे खेळाडू त्या व्यक्तीला पाहत राहिले. अखेर या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी पकडे आणि त्याचे शरीर कपड्याने झाकले. सुरक्षा रक्षकांना या व्यक्तीला पकडताना नाकेनऊ आले होते. अखेर त्याला पकडून मैदानाबाहेर नेण्यात आले.

हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने १९९२ नंतर वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंड संघ दाखल झाला आहे. न्यूझीलँडला हरवल्यानंतर इंग्लंड संघाने २७ वर्षाचा इतिहास बदलला आहे.

जाणून घ्या मायग्रेनचा त्रास दूर करणारे ५ महत्त्वाचे उपाय

ही ‘आसने’ करतील कंबर ‘सडपातळ’ करण्यास मदत

आता स्वतःहूनच नष्ट होतील ‘कर्करोगाच्या’ पेशी